![]()
संभाजीनगर ते जळगाव या महामार्गावरील उंडणगाव-पानवडोद चौफुली गोळेगाव खुर्द येथे सर्व एसटी बसेसना थांबा मिळावा, या मागणीला यश आले आहे. भारतीय जनता पक्ष आदिवासी आघाडी मोर्चाच्या रीना संदीप इंगळे यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक यांच्याकडे निवेदन देऊन पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीची दखल घेत विभाग नियंत्रकांनी गोळेगाव खुर्द येथे सर्व बसेस थांबवून प्रवाशांना चढ-उतार करण्याचे आदेश आगार व्यवस्थापकांना दिले आहेत. या थांब्याअभावी गोळेगाव खुर्द, उंडणगाव, पानवडोदसह परिसरातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण व दिव्यांग प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. माजी सरपंच गणेश बनकर यांनीही यासाठी पुढाकार घेतला होता. या पाठपुराव्याला प्रतिसाद देत विभागाने २७ ऑक्टोबर रोजी थांब्याचा फलक लावून चालक-वाहकांना सूचना देण्याचे निर्देश दिले. सिल्लोड आगाराचे प्रतिनिधी गजानन केनेकर, जिल्हा परिषद सदस्य सचिन वाघ, सरपंच गणेश बनकर, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश बनकर, उपसरपंच अनिल बनकर, माजी सरपंच कृष्णा उखर्डे, दिलीप पाटील, योगेश सपकाळ, सचिन धनवई, सार्थक खुल्लोडकर, कैलास बसैये, नागेश धनवई, रामेश्वर सनान्से, अरुण बनकर, राजू धनवाई, नामदेव मुळे आदी उपस्थित होते.
Source link
गोळेगाव खुर्द येथे बसथांब्याला मंजुरी; चालक, वाहकाचा सत्कार