![]()
माजी मंत्री राजेश टोपे नागपूरहून जालन्याकडे समृद्धी महामार्गाने प्रवास करत असताना महामार्गावर झालेल्या एका भीषण अपघाताची दुर्दैवी घटना घडली. अपघातामुळे अनेक वाहने रस्त्यावर थांबलेली असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने सुमारे 15 ते 20 वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले. या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन राजेश टोपे साहेब यांनी तत्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला. अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या जखमी नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी तसेच त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी सहकार्य केले. समृद्धी महामार्गावर सातत्याने घडणारे अपघात ही अत्यंत चिंतेची बाब आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अशा दुर्घटना रोखण्यासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. महामार्गावरील वाहतूक नियंत्रण, वेगमर्यादेची कठोर अंमलबजावणी, आपत्कालीन मदत यंत्रणा अधिक सक्षम करणे आणि अपघातप्रवण ठिकाणी विशेष सुरक्षा व्यवस्था उभारणे गरजेचे आहे. या अपघातातील सर्व जखमी नागरिकांना लवकरात लवकर प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली जात आहे.
Source link
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात:भरधाव कंटेनरची 15 ते 20 वाहनांना जोरदार धडक; मदतीसाठी माजी मंत्री राजेश टोपेंची धाव