![]()
ठेंगोडा परिसरात महिनाभरापूर्वी एका मेंढपाळ महिलेचा बळी घेतल्यानंतर शांत झालेली बिबट्याची दहशत २५ दिवसांनी निर्माण झाली आहे. वनविभागाने सूतगिरणी परिसरातील काठेवाडी वस्तीवर सात पिंजरे लावलेले असतानाही, चक्क पिंजऱ्यापासून अवघ्या तीनशे मीटर अंतरावर बिबट्याने शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी अशा बारा तासांच्या आत दोनदा घरात घुसण्याचा प्रयत्न केला. घरातील गरोदर महिलेच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असला, तरी काठेवाडी वस्तीसह संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. सूतगिरणी परिसरातील काठेवाडी वस्तीवर शुक्रवारी (दि. १३) रात्री नऊ वाजेच्या सुमारास जलाराम सभाड यांच्या घरात बिबट्याने शिरण्याचा प्रयत्न केला. बिबट्या आत येत असल्याचे घरातील गरोदर महिला अमृता सभाड यांच्या वेळीच निदर्शनास आले. त्यांनी तातडीने आरडाओरड केल्याने जलाराम सभाड यांनी हातात काठी घेत जोरजोरात आवाज केला, त्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला. त्यानंतर शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास त्याच घरात बिबट्याने पुन्हा प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीय आधीच सतर्क असल्याने त्यांनी आरडाओरड करून बिबट्याला जवळील काटेरी वनात पिटाळून लावले. अजय चव्हाण, ठेंगोडा महिनाभरापूर्वी बोरसे यांच्या मळ्यात बिबट्याने महिलेला ठार केले होते. वनविभागाने ड्रोन कॅमेऱ्यासह पथक तैनात करून बिबट्याला जेरबंद केले होते. मात्र, तीन बिबटे असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला होता. वनविभागाने दोन-तीन दिवस ड्रोनद्वारे शोध घेतला, पण बिबट्या न दिसल्याने तो एकच होता व जेरबंद झाला असा अंदाज बांधत पथक निघून गेले. ^सदर ठिकाणी बिबट्या नसून तरस असल्याचे आमच्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्या ठिकाणी सात कर्मचारी तैनात करण्यात आले असून वन्यप्राण्याला जेरबंद करण्यासाठी आधीपासूनच पिंजरा लावण्यात आलेला आहे. ठेंगोडासह परिसरात पिंपळद, सावकी या ठिकाणी शोध घेणे सुरू आहे. – सोमनाथ आमले, वनपरिक्षेत्र अधिकारी सटाणा शुक्रवारी रात्री भररस्त्यावर बिबट्या आला आडवा शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास मी घराकडे जात असताना सूतगिरणी परिसरात भररस्त्यावर बिबट्या आडवा आला. समोर बिबट्याला पाहताच माझी चांगलीच भंबेरी उडाली. मी कसाबसा स्वतःला सावरत काठेवाडी वस्तीतील नागरिकांना बिबट्या आल्याची माहिती दिली आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले. ठेंगोडा परिसरात बिबट्याच्या हल्ले सुरूच आहे. यापूर्वी १८ ऑक्टोबर रोजी पहाटे सूतगिरणी परिसरातील काठेवाडी वस्तीतील मधुबाई सभाड यांच्यावर बिबट्याने हल्ला करून त्यांच्या डोक्याला गंभीर जखमा केल्या होत्या; त्यांच्यावर सध्या आनंद (गुजरात) येथे उपचार सुरू आहेत. या घटनेच्या अवघ्या दोन दिवसांनी, म्हणजे २० ऑक्टोबर रोजी प्रातर्विधीसाठी गेलेल्या बेबीबाई बोरकर या महिलेवर बिबट्याने हल्ला केला, ज्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
Source link
7पिंजरे तरीही बिबट्याने 12तासांत दोनदा केला घरात घुसण्याचा प्रयत्न:ठेंगाेड्यात गरोदर महिलेच्या सतर्कतेमुळे बचावले कुटुंब