Headlines

परतीच्या प्रवासाला "हाऊसफुल्ल' गर्दी! गावी आलेल्यांचा शहराकडे प्रवास सुरू:पुणे-मुंबई मार्गावर सर्वाधिक ताण, उभ्याने प्रवास करण्याची वेळ




दिवाळी आणि भाऊबीजेच्या सणानिमित्त गावी आलेले चाकरमानी, बाहेरगावी शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि व्यावसायिक आता पुन्हा शहराकडे परतू लागले आहेत. या परतीच्या प्रवासामुळे अहिल्यानगर शहरातील तारकपूर, माळीवाडा आणि स्वस्तिक चौक बसस्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी उसळली आहे. बसेस ‘हाऊसफुल्ल’ आहेत. जागा मिळत नसल्याने काही प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागतो. तसेच छत्रपती संभाजीनगरहून पुण्याकडे जाणाऱ्या बसेसमध्ये जागा नसल्याने बसस्थानकात प्रवाशांना थांबावे लागते. सणापूर्वी, ९ नोव्हेंबरपासून एसटी महामंडळाने जादा गाड्यांचे नियोजन केले होते. सुरुवातीला ५२ जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली. मात्र, आता परतीचे प्रवासी, तसेच भाऊबिजेसाठी जाणारे आणि येणारे प्रवासी यांची संख्या वाढल्याने गर्दी आणखी वाढली आहे. सर्वाधिक प्रवासी अहिल्यानगर-पुणे आणि अहिल्यानगर-मुंबई मार्गावर असल्याची माहिती प्रशासनाने दिली. शिक्षण आणि नोकरीसाठी शहरात परतणाऱ्यांना वेळेत पोहोचता यावे, यासाठी गर्दीच्या वेळी जादा फेऱ्या सोडण्यावर भर दिला जात असल्याचे सांगण्यात आले. तारकपूर, माळीवाडा आणि स्वस्तिक चौक या तिन्ही स्थानकांवर सकाळपासूनच प्रवाशांची वर्दळ दिसून येत आहे. पुणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांत जागा मिळवण्यासाठी प्रवाशांची धावपळ सुरू आहे. दररोज सुमारे २०० फेऱ्या होत असून, शाळा बंद असल्याने काही ग्रामीण फेऱ्यांवर परिणाम झाला आहे. पुणे-मुंबई मार्गावर अतिरिक्त ८० बसगाड्या सणाच्या काळात एसटीने ९ नोव्हेंबरपासून ५२ जादा गाड्यांची व्यवस्था केली होती. परतीच्या प्रवासातील वाढती गर्दी पाहता आता ८० अतिरिक्त बसेस सोडण्यात येत आहेत, तर ही सुविधा मंगळवार, १७ नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध राहणार आहे. सर्वाधिक गर्दी अहिल्यानगर-पुणे आणि अहिल्यानगर-मुंबई मार्गावर असल्याने जादा फेऱ्यांचा भर याच मार्गांवर आहे. छत्रपती संभाजीनगर ते पुणे बुकिंग बंद, अहिल्यानगरचे सुरू ^ छत्रपती संभाजीनगर ते पुणे मार्गावर धावणाऱ्या बसला पूर्वी तारकपूर व स्वस्तिक चौक बसस्थानकातून आपण प्रवाशांना बुकिंग सेवा देत होतो. परंतु, सणाच्या पार्श्वभूमीवर येथून बुकिंग न करता आपण अहिल्यानगर विभागाच्याच गाड्या उपलब्ध करून दिल्या आहे. नियमित लालपरी व्यतिरिक्त १० शिवाई या मार्गावर धावत आहे. प्रवाशी बसस्थानकातून बुकिंग करू शकतात. पुढील दोन दिवसांत प्रवाशांची संख्या वाढली वाढीव गाड्या दिल्या जातील. राजेंद्र जगताप, विभाग नियंत्रक.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *