Headlines

Sanjay Shirsat Statement On Amit Shah Maharashtra Visit; Political Impact


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत मिळत आहेत. “अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे प्रमुख नेते आहेत; ते जिथे जातात तिथे आपला ठसा उमटवूनच निघतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणा

.

अमित शहांचा दौरा आणि राजकीय समीकरणे

गेल्या 15 दिवसांपासून राज्यात विविध राजकीय चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काय चर्चा झाली, हे फक्त त्यांनाच माहीत आहे. मात्र, विलीनीकरणाच्या चर्चा आणि इतर समीकरणे जुळवण्याचे प्रयत्न सुरू असताना, शहा यांनी मुद्दाम वेळ देऊन सर्व घटनांचा बारकाईने अभ्यास केला आहे. त्यामुळे आता ते या सर्व चर्चांना पूर्णविराम देत योग्य तो सोक्षमोक्ष लावतील, असा विश्वास शिरसाट यांनी व्यक्त केला.

‘ऑपरेशन टायगर’चा अंतिम टप्पा एकनाथ शिंदे यशस्वी करतील

शिवसेनेतील पक्षप्रवेशाच्या आणि ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवर शिरसाट यांनी स्पष्ट भूमिका मांडली. सध्या काही पक्षांमध्ये कार्यकर्त्यांचा दुष्काळ पसरला असून ते सर्वत्र भटकताना दिसत आहेत. अनेकांनी आधीच घर सोडले असून ते पुन्हा मागे फिरणार नाहीत. ‘ऑपरेशन टायगर’ नक्की होणार असून त्याचा अंतिम टप्पा यशस्वी करण्याची जबाबदारी आणि तारीख ठरवण्याचा पूर्ण अधिकार एकनाथ शिंदे यांना आहे. ते नक्कीच हे अभियान यशस्वी करून दाखवतील, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

दुष्काळी मदतीचा दुसरा टप्पा लवकरच मिळणार

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीबाबत माहिती देताना शिरसाट यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले. राज्य सरकारने केंद्राकडे 28000 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केली होती, त्यापैकी 11000 कोटी रुपयांचा पहिला टप्पा राज्याला प्राप्त झाला आहे. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या संदर्भात बोलले असून ही मदत नक्कीच वाढणार आहे. पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्याची मदतही लवकरच येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून या मदतीच्या वितरणाचे काम योग्य रीतीने हाताळले जावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

विरोधकांवर निशाणा आणि अजित पवार प्रकरणावर भाष्य

पत्रकार परिषदेत शिरसाट यांनी विविध राजकीय मुद्द्यांवरही आपली मते मांडली. अजित पवार यांच्या अपघाताबाबत जर कोणाकडे काही ठोस माहिती असेल आणि ते ती उघड करत असतील, तर त्याचे स्वागतच आहे. या माहितीमुळे पोलिसांना तपासात सहकार्य मिळेल आणि घात की अपघात हे प्रकरण एकदाचे निकाली निघेल, असे शिरसाट म्हणाले.

बॅनरबाजी आणि बाळासाहेबांचे कर्तृत्व

बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लहान आहे की मोठा, यावरून राजकारण करणाऱ्यांचा त्यांनी समाचार घेतला. फोटोच्या आकारावरून माणसाची उंची किंवा स्वभाव ठरत नाही. शिवसेनाप्रमुखांचे मोठेपण हे जनसामान्यांच्या मनात असलेल्या त्यांच्या प्रतिमेमुळे आहे, असे ते म्हणाले.

दुसरीकडे, सोनिया गांधी यांच्या पुस्तकावर होणाऱ्या घाईघाईच्या टीकेवरही त्यांनी भाष्य केले. हे पुस्तक म्हणजे भारताचा अर्थसंकल्प नाही की लगेच त्यावर टीका करावी. आधी ते आत्मचरित्र पूर्ण वाचावे, त्याचा अभ्यास करावा आणि त्यानंतरच मत मांडावे. भारतीय संस्कृतीत कोणत्याही महिलेचा अनादर केला जात नाही, त्यामुळे न वाचता टीका करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नताशा आव्हाड यांच्या विधानावर बोलताना, त्या पक्षाच्या कार्यकर्त्या असल्या तरी जितेंद्र आव्हाड हे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांच्याच भूमिकेला पक्षात महत्त्व आहे, असे शिरसाट म्हणाले. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेली टीका हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगत त्यांनी त्यावर अधिक भाष्य करणे टाळले. वकिली करणाऱ्यांनी पक्षाच्या राजकारणात जास्त बोलू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

—————————————————————-

हेही वाचा…

पुण्यात महायुतीच्या दिग्गजांची खलबतं: मुख्यमंत्री फडणवीसांनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शहांची भेट

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सोमवारी (16 नोव्हेंबर) पुण्यात दाखल होत अमित शहा यांची भेट घेतली आहे. पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील जे. डब्लू. मेरिएट हॉटेलमध्ये या बड्या नेत्यांमध्ये बंद दाराआड महत्त्वाची बैठक सुरू असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून समोर आली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.