Headlines

अजितदादांच्या मृत्यूनंतर अवघ्या 2 दिवसांत अमेरिकेत 18 कोटींचे घर खरेदी:रोहित पवारांकडून VSR कंपनीच्या संपत्तीचा भांडाफोड!




महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या मृत्यूला साडे नऊ महिने उलटून गेले तरी अद्याप चौकशी अहवाल समोर आलेला नाही. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आणि अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत सरकारवर आणि तपास यंत्रणांवर गंभीर आरोप केले आहेत. हा अपघात होता की घातपात, यावरून संभ्रम कायम असून, त्यांनी याप्रकरणी सीबीआय (CBI) चौकशीची मागणी केली आहे; तसेच, अपघाताच्या दिवशी झालेल्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, ते समाजकारण आणि राजकारण प्रामाणिकपणे करतात आणि अजितदादांचा पुतण्या म्हणून त्यांना या प्रकरणातील सत्य शोधण्याची गरज वाटते. त्यांनी अजित पवारांचे काही व्हिडिओ दाखवून त्यांच्या प्रशासनावरील वचकाची आठवण करून दिली. “हा अपघात होता की घातपात, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे,” असे सांगत त्यांनी काही प्रामाणिक लोकांकडून मिळालेल्या माहितीचा संदर्भ दिला. तसेच, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यामुळे अजितदादांना आपला नियोजित कारचा प्रवास रद्द करून विमानाने जावे लागले, याकडे त्यांनी लक्ष वेधले. विमानातील त्रुटी आणि तपासातील कुचराई रोहित पवार यांनी विमान अपघाताच्या कारणांबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले. विमानात पुरेसे इंधन होते आणि उड्डाणाच्या वेळीही त्यात इंधन जास्त असल्याचे समोर आले आहे, असा दावा त्यांनी केला. ब्लॅक बॉक्स जळाल्याचे सांगण्यात आले असून, अमेरिकेची संस्था आणि ‘डीजीसीए’च्या (DGCA) अहवालानुसार विमानात अनियमितता असल्याचे सिद्ध झाले आहे; तरीही सरकार आणि तपास यंत्रणांनी अद्याप ठोस कारवाई केलेली नाही. “आम्ही एफआयआरची मागणी केली होती, पण ती नोंदवली गेली नाही,” असा आरोप त्यांनी केला. संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि न्यायाची प्रतीक्षा रोहित पवार यांनी शिवनिका ट्रस्ट आणि समता पतसंस्थेतील संशयास्पद आर्थिक व्यवहारांचा मुद्दाही उचलला. त्यांच्या माहितीनुसार, अजितदादांच्या अपघाताच्या आसपासच्या काळात (२७ ते २९ जानेवारी २०२६) समता पतसंस्थेतून ५ कोटी ३३ लाख रुपयांचे व्यवहार झाले. “१ एप्रिल २०२५ ते १७ मार्च २०२६ या कालावधीत दरमहा कधी १ तर कधी ७ मेसेज, तर कधी ८ मेसेज यायचे; पण २७ जानेवारी म्हणजे अजित दादांचा अपघात झाला, त्याच्या एक दिवसआधी समता पतसंस्थेच्या व्यवहाराचे १७ मेसेज आले होते, तर २८ जानेवारी ज्यादिवशी अजित दादांचा अपघात घडला, त्या दिवशी १९ मेसेज आले होते,” असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच, अजितदादांच्या घराबाहेर काळी जादू झाल्याची माहिती देऊनही सीआयडीने तपास न केल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला आणि एवढ्या मोठ्या नेत्याला न्याय मिळवून देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी काहीही प्रयत्न केले नसल्याचे सांगत खंत व्यक्त केली. आता VSR चे देशाबाहेरील संपत्ती आणि गुन्हेगारी संबंध. आता हे नवीन आहे, हे थोडंसं तुम्ही सर्वांनी समजून घ्यावं. आता VSR कोण असा लागून गेला की त्याला एवढं वाचवलं जातं, कोण काय आहे त्याच्याकडे? त्याच्याकडे काय असेल तर पैसा आहे. तो कसा आहे मी तुम्हाला सर्वांना दाखवून देतो, पुढं. VSR कंपनीची मालमत्ता किती? रोहित पवार म्हणाले, राहुल सिंग, गोल्डन विझा, ठीक आहे, कोणालाही मिळू शकतो, पैसे असेल तर काय हरकत नाही. त्यानंतर त्याचं दुबईमध्ये कंपनी रजिस्टर्ड आहे. त्याच्याकडे तिथं दोन विमानं… दुबईमध्ये त्यांनी तिथे घेतली, ग्लोबल ५०० विमान. लय महाग आहे, दीडशे कोटीचं विमान आहे. याच्यामध्ये कोणाचं आहे हे, तर हे हैदराबादची एक कंपनी आहे, ‘विश्वसमुद्र’. तिथे असणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या फार जवळची कंपनी आहे. त्याचं हे विमान आहे जे VSR च्या नावावर आहे. आणि VSR चा मालक राहुल सिंगचा गोल्डन विझा मी इथे दाखवलेला आहे. आता ही साडे नऊ कोटीची गाडी आहे, ही साडे चार कोटीची गाडी आहे, ही साडे सात कोटीची गाडी आहे आणि ही काहीतरी अडीच कोटीची गाडी आहे. ह्या सगळ्या गाड्या कोणाच्या आहेत? त्या रोहित सिंग, राहुल सिंग आणि व्हीके सिंग. पण ह्या गाड्या आहेत कुठं? महाराष्ट्रात? भारतामध्ये? नाही, तर ह्या आहेत अमेरिकेमध्ये. हे विमान आणि त्याच्यामागचं एक रहस्य मी नंतर तुम्हाला सांगतो, हे अमेरिकेमध्ये रजिस्टर्ड आहे. याचा नंबर आहे N29VK. आता व्हीके सिंग, व्हीके, समजून घ्या. आता हे सुंदर असं १८ कोटीचं घर आहे. हे कधी विकत घेतलं? दादा गेल्यानंतर दोन दिवसांनंतर विकत घेतलं. १८ कोटीचं घर आहे. कुठं आहे? तर हे आहे फ्लोरिडामध्ये. कोणाकडनं बाय केलं? तो कोडॅक ब्लॅक. कोडॅक म्हणजे फोटोग्राफर समजू नका, पुढे जाऊन तुम्हाला कोडॅक ब्लॅकबद्दल सांगतो. कोडॅक ब्लॅक नावाचा एक सिंगर आहे, अतिशय महापराक्रमी माणूस आहे. त्याच्याकडनं १८ कोटीला दादा गेल्यानंतर, दादा गेल्यानंतर दोन दिवसांनी हे १८ कोटीचं घर हे तिथं फ्लोरिडामध्ये या परिवाराने तिथं घेतलं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *