Headlines

Ashish Shelar Targets Rahul Gandhi Over Voter List Controversy in Mumbai


मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेवरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर भाजप नेते व कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी अत्यंत तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. “देशातील 3 कोटी लापता, अवैध आणि अभार

.

काँग्रेसच्या 39 प्रश्नांसमोर आशिष शेलार यांचे 6 थेट सवाल

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत काँग्रेसने 30 ते 39 प्रश्न उपस्थित करत जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे शेलार म्हणाले. हा मामला न्यायप्रविष्ट असला, तरी काँग्रेसच्या या अपप्रचाराची पोलखोल करण्यासाठी शेलार यांनी राहुल गांधींना खालील 6 प्रश्न विचारले…

  1. संसदेत चर्चा का केली नाही?: जे मुद्दे तुम्ही आज सर्वोच्च न्यायालयात मांडत आहात, ते जनतेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून विरोधी पक्षनेते किंवा खासदार म्हणून तुम्ही संसदेत का उपस्थित केले नाहीत?
  2. निवडणूक आयोगाकडे तक्रारी का केल्या नाहीत?: सर्वोच्च न्यायालयात मांडलेल्या प्रश्नांसंदर्भात काँग्रेसच्या बूथ लेव्हल एजंट्सनी (बीएलए 2) निवडणूक आयोगाच्या विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांकडे किती मागण्या किंवा सूचना सादर केल्या, याची आकडेवारी जाहीर करावी.
  3. 4 वेळा सुनावणीच्या अधिकाराचा वापर का केला नाही?: एसआयआर प्रक्रियेत नाव वगळल्यास किंवा आक्षेप असल्यास मतदाराला कायदेशीररीत्या 4 वेळा अपील आणि सुनावणी मागण्याचा अधिकार असतो. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी किती मतदारांना या 4 सुनावणींचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले?
  4. काँग्रेसच्या काळातील 12 पुनरीक्षणांवेळी गप्प का होता?: काँग्रेसच्या सत्ताकाळात एकदा-दोनदा नव्हे, तर तब्बल 12 वेळा मतदार यादीचे विशेष पुनरीक्षण झाले आहे. त्यावेळी तुम्हाला हे प्रश्न का पडले नाहीत?
  5. कायद्यात किती वेळा बदल केले?: भारतीय संविधान आणि लोकप्रतिनिधित्व कायद्यात निवडणूक व मतदार यादी शुद्धीकरणाच्या तरतुदी आहेत. मोदी सरकारने या कायद्यात एकदाही बदल केलेला नाही; मात्र काँग्रेस सरकारने आपल्या काळात यात किती वेळा दुरुस्त्या केल्या, याचे उत्तर द्यावे.
  6. मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक कशी व्हायची?: इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या सरकारच्या काळात मुख्य निवडणूक आयुक्तांची (सीईसी) नेमणूक केवळ पंतप्रधानांच्या किंवा मंत्रिमंडळाच्या एका साध्या पत्राद्वारे व्हायची का? त्यावेळी निवड समिती होती का, याचे स्पष्टीकरण राहुल गांधी आणि महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी द्यावे.

रोहित पवारांचे वक्तव्य म्हणजे ‘राजकीय नीचपणा’

काल रोहित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर भाष्य करताना आशिष शेलार यांनी अत्यंत कठोर शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, “रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात मांडलेली भूमिका हा निव्वळ राजकीय नीचपणा आहे. त्यांच्या या आरोपांमागे कोणताही थेट, सबळ, दुर्बळ किंवा परिस्थितीजन्य पुरावा नाही आणि असूही शकत नाही; कारण त्यात सत्यच नाही. एकीकडे ते म्हणतात की मी मुख्यमंत्र्यांबद्दल बोलत नाही, आणि दुसरीकडे संभ्रमाचे वातावरण निर्माण करतात. त्यांच्या कुटुंबातील किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वैफल्यातून आलेल्या चिडीतून आणि खोटे बोलण्याच्या नशेतून ते अशी विधाने करत आहेत.”

पत्रकाराला धक्काबुक्की करणाऱ्या अरविंद सावंतांच्या पक्षाने जाहीर माफी मागावी

खासदार अरविंद सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी वृत्तवाहिनीचे पत्रकार देशमुख यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याच्या घटनेचा शेलार यांनी तीव्र निषेध केला. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात संपादकांना घरातून खेचून तुरुंगात टाकण्यात आले, समाजमाध्यमांवर मत मांडणाऱ्या तरुणाचे वडाळ्याच्या चौकात मुंडन करण्यात आले आणि व्यंगचित्र फॉरवर्ड करणाऱ्या निवृत्त नौदल अधिकाऱ्याचा डोळा फोडण्यापर्यंत या ‘बनाना रिपब्लिक’ मानसिकतेच्या लोकांची मजल गेली होती, अशी टीका शेलार यांनी केली. पत्रकारांना संरक्षण देण्यासाठी पोलीस व राज्य सरकार सक्षम असून कायदेशीर कारवाई होईलच, मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने या प्रकरणी जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

संजय राऊत आणि मतदारसंघ पुनर्रचनेवर भूमिका

मुंबई महापालिका आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) वादावरून संजय राऊत यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर शेलार म्हणाले की, राऊतांना महापालिकेच्या कामकाजाची किंवा विकास नियंत्रण नियमावलीची (डीसीआर) काहीही माहिती नाही; कोणीतरी दिलेल्या स्क्रिप्टवर ते केवळ बोलत असतात. तसेच, मतदारसंघ पुनर्रचनेच्या (डीलिमिटेशन) मुद्द्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या विसंगत भूमिकांवर भाष्य करताना, हा केंद्रीय आणि संसदीय पातळीवरील विषय असून भाजपचे केंद्रीय नेतृत्व त्यावर योग्य वेळी उत्तर देईल, असे शेलार यांनी स्पष्ट केले.

——————————————————

हेही वाचा…

अंत्यविधीपूर्वीच पीआर कॅम्पेन चालवून टाळूवरचे लोणी खाल्ले: अजितदादांच्या अपघातामागे रोहित पवारांच्या साखर कारखान्याच्या धुराचे षडयंत्र का? भाजपचा जोरदार पलटवार

दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले असून, भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ता नवनाथ बन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. “बारामती विमानतळापासून 6 ते 7 किलोमीटर अंतरावर शेटफळ येथे असलेल्या रोहित पवारांच्या साखर कारखान्याच्या धुरामुळे दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) कमी होऊन अजितदादांचा अपघात झाला का? या अपघातामागे रोहित पवार आणि त्यांच्या कारखान्याचे षडयंत्र आहे का, याची सखोल चौकशी झाली पाहिजे,” अशी मोठी मागणी नवनाथ बन यांनी केली आहे. मंगळवारी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि खासदार अरविंद सावंत यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.