Headlines

अहिल्यादेवींच्या जलसंवर्धनाचा वारसा पुढे नेत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करू:जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांचा निर्धार‎



श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईनगरीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयजयकार घुमला. अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून निघालेल्या दोन्ही जलयात्रांचे सोमवारी शिर्डीत आगमन झाले. अ

.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि मंत्री विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ‘गोदा ते नर्मदा’ या विशेष जलयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे गोदा नदीचे उगमस्थान असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे जन्मस्थळ असलेल्या चोंडी येथून यात्रेची सुरूवात करण्यात आली. दोन्ही यात्रा शिर्डी मध्ये एकत्रित होवून मध्यप्रदेशकडे सोमवारी रवाना झाल्या. शिर्डीतील मल्हारी मार्तंड मंदिरात मंत्री विखे पाटील, खा. वडतुके, आ. गोपीचंद पडळकर आणि आ. सदाभाऊ खोत यांनी राज्यातील सर्व नद्यांमधून आलेल्या जलकलशाचे पूजन केले.

शहरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत अहिल्यादेवींचा पुतळा आणि कलशाचा रथ मुख्य आकर्षण ठरला. पारंपरिक धनगर नृत्याने वातावरणात रंगत आणली. विशेष म्हणजे, मंत्री विखे पाटील यांच्यासह सर्व आमदार एकाच बसमधून प्रवास करत असल्याने या यात्रेची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

शिर्डी आणि महेश्वरचे आध्यात्मिक नाते यावेळी आयोजित सांस्कृतिक सोहळ्यात विखे पाटील म्हणाले, अहिल्यादेवींनी केवळ जलसंधारणाची चळवळ उभी केली नाही, तर सांस्कृतिक वारसाही जपला. श्री दासगणू महाराजांनी ‘श्री साईबाबा सुवर्ण मंजिरी’ हा ग्रंथ महेश्वरमध्ये लिहिला, त्यामुळे शिर्डी आणि महेश्वरचे नाते अध्यात्माने जोडले गेले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *