Headlines

अजित पवार विमान अपघाताची चौकशी सीबीआय किंवा सीआयडीकडे देण्याची मागणी:पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवारचे आंदोलन; नऊ महिन्यांनंतरही अहवाल नसल्याचा सवाल




अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी आमदार रोहितदादा पवार यांनी उपस्थित केलेल्या रास्त प्रश्नांना बगल देणाऱ्या आणि जनतेची दिशाभूल करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी बुधवारी पुण्यातील ऐतिहासिक अलका टॉकीज चौक येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार, पुणे शहरच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले आणि या प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणण्याची ठाम मागणी केली. विमान कंपनीच्या मालकाची चौकशी: या अपघाताला जबाबदार असलेल्या संबंधित विमान कंपनीच्या मालकाची अद्याप सखोल चौकशी का झाली नाही, याचा जाब विचारण्यात आला. अपघाताला नऊ महिने उलटून गेल्यानंतरही अधिकृत चौकशी अहवाल अद्याप समोर का आला नाही, याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणामागील सत्य बाहेर येण्यासाठी हा तपास तातडीने सीबीआय किंवा सीआयडीमार्फत निष्पक्षपणे करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी लावून धरण्यात आली. या आंदोलनात पुणे शहर युवक अध्यक्ष किशोर कांबळे, स्वातीताई पोकळे, अजिंक्य पालकर, सुनील माने, विक्रांत पाटील, रोहन पायगुडे, अमोल परदेशी, अमोल जाधव, ओम पोकळे, स्वप्निल जोशी, समीर पवार, अर्जुन गांजे, कुशल मोरे, सुनील चव्हाण, देवा चलवादी, चेतन भोईटे, मंगेश जाधव, साहील कांबळे, स्वप्नील तांबे, हर्षवर्धन दिघे यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, युवक कार्यकर्ते आणि पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *