Headlines

Shaina NC Apologizes Over Balasaheb Thackeray Photo Controversy in Mumbai


शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शायना एनसी यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याने राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेनंतर शायना एनसी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, या प्रकाराम

.

काँग्रेस नेत्या तथा खासदार सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रातील काही उल्लेखांवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पुस्तकातील पान क्रमांक 201 आणि 443 वरील मजकुरावरून भाजपसह एनडीएतील घटक पक्षांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. विशेषतः स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत करण्यात आलेल्या उल्लेखांवरून सत्ताधारी पक्षांकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या सहा प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसविरोधात भूमिका मांडली. मात्र, या पत्रकार परिषदेदरम्यान शायना एनसी यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याचा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर शिवसैनिकांमध्ये नाराजी व्यक्त होऊ लागली. त्यानंतर शायना एनसी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले.

‘बाळासाहेब आमच्यासाठी देवासमान व्यक्तिमत्त्व’

शायना एनसी यांनी व्हिडिओमध्ये म्हटले की, हिंदुहृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी नेहमीच देवासमान व्यक्तिमत्त्व राहिले आहेत. माझे वडील आणि बाळासाहेब यांच्यात अतिशय जवळचे मैत्रीचे संबंध होते. बाळासाहेबांनी नेहमीच मला आपल्या मुलीप्रमाणे वागणूक दिली. त्यामुळे त्यांचा अपमान करणे किंवा त्यांचा अनादर करण्याचा विचारही मी करू शकत नाही. असे करणे माझ्यासाठी अशक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागते’

पुढे त्या म्हणाल्या की, काल पत्रकार परिषदेत मणिशंकर अय्यर यांचा फोटो पाहिला. ज्या मणिशंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला होता, त्यांच्या फोटोवर बाळासाहेब ठाकरे यांनी पूर्वी चप्पल मारली होती. त्यामुळे त्या फोटोबाबत आपली भूमिका होती. मात्र, या प्रकारामुळे अनेक लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. विशेषतः कट्टर शिवसैनिकांना याचा त्रास झाला असेल, तर मी हात जोडून त्यांची माफी मागते. यामध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

सावरकरांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न का?

शायना एनसी यांनी यावेळी सावरकरांच्या मुद्द्यावरून विरोधकांनाही प्रश्न विचारले. इतिहासाचे चुकीचे चित्रण केले जात असेल किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान पुसण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्यावर आक्षेप घेऊ नये का? केवळ सत्तेत राहण्यासाठी काही पक्षांच्या मांडीला मांडी लावून बसायचे आणि आपल्या विचारधारेशी तडजोड करायची का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला नेहमीच नम्रतेने काम करण्याची शिकवण दिली आहे. राजकारणापेक्षा समाजसेवेला अधिक महत्त्व द्यायचे, जमिनीवर उतरून काम करायचे, अशी त्यांची भूमिका असल्याचेही शायना एनसी यांनी सांगितले. 90 टक्के समाजसेवा आणि 10 टक्के राजकारण या विचाराने आम्ही काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

बाळासाहेबांच्या पुण्यतिथीवरून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला सवाल

याच व्हिडिओमध्ये शायना एनसी यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही लक्ष्य केले. काँग्रेस पक्षाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मूलभूत आदर तरी आहे का? जर तसा आदर असेल, तर त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसने ट्विट का केले नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच, सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील पान क्रमांक 201 आणि 443 वर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत करण्यात आलेल्या उल्लेखांवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली. सावरकरांना ‘हिंदू फॅसिस्ट’ असे संबोधल्याचा उल्लेख करताना उद्धव ठाकरे गट यावर गप्प का आहे? केवळ सत्तेसाठी आणि राजकीय समीकरणांसाठी आपल्या विचारधारेशी तडजोड केली जात आहे का? असा सवाल त्यांनी केला.

‘माझ्यावर टीका करा, पण इतिहास बदलू नका’

शायना एनसी यांनी आपल्या 22 वर्षांच्या सार्वजनिक जीवनाचाही उल्लेख केला. माझ्या कामावर टीका करा, माझ्या सार्वजनिक सेवेवर प्रश्न उपस्थित करा; मात्र इतिहास पुन्हा लिहिण्याचा किंवा स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान पुसण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असे त्या म्हणाल्या. माझ्या 22 वर्षांच्या सार्वजनिक जीवनात कोणताही वाद नसताना आता माझ्यावर टीका केली जात आहे. मात्र, त्यापलीकडेही विरोधकांनी काही गंभीर प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या घटनेमुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी मनापासून माफी मागते. मात्र, सावरकरांचा अपमान आणि इतिहासाचे चुकीचे चित्रण यावर प्रश्न उपस्थित करतच राहणार असल्याचे शायना एनसी यांनी या व्हिडिओतून स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या या स्पष्टीकरणानंतरही राज्यातील राजकीय वाद शांत होणार की आणखी चिघळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

……………………………………………………………………………………………

हेही वाचा…

एसआरए 33(11) प्रकल्पांचे मुंबईतील सर्वात मोठे लाभार्थी राऊत बंधूच: नवनाथ बन यांचा पलटवार, टिपू सुलतान प्रकरणावरून अमित देशमुखांवरही टीका

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) प्रकल्पांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पुराव्यानिशी जोरदार पलटवार केला आहे. “ज्या 33(11) योजनेतील प्रकल्पांवर संजय राऊत आक्षेप घेत आहेत, त्या प्रकल्पांचे मुंबईतील सर्वात मोठे लाभार्थी स्वतः राऊत बंधू आणि त्यांच्याशी संबंधित ‘श्रद्धा’ ग्रुपच्या कंपन्या आहेत,” असा खळबळजनक आरोप नवनाथ बन यांनी केला आहे. गुरुवारी (19 नोव्हेंबर 2026) मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस आमदार अमित देशमुख यांचा लातूरमधील टिपू सुलतान कार्यक्रमातील नोटा उधळण्याचा प्रकार, बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो फाडण्याचा वाद आणि दादर रेल्वे स्थानकाचे ‘चैत्यभूमी’ नामकरण या मुद्द्यांवरून विरोधकांवर चौफेर हल्लाबोल केला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.