Headlines

लासलगावी स्टेशन रोडवर दुचाकीच्या डिक्कीतील 50 हजार रुपये लंपास:मोबाईल चोरांचा आठवडे‎बाजारात सुळसुळाट




लासलगाव स्टेशन रोडवरील महावीर मॉल येथे खरेदीसाठी गेलेल्या अनिल जगताप (रा. शुभश्री अपार्टमेंट, टाकळी विंचूर) यांच्या दुचाकीच्या डिक्कीतील ५० हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि. १८) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. जगताप हे महावीर मॉल येथे खरेदीसाठी गेले असताना त्यांनी आपली दुचाकी बाहेर उभी केली होती. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दुचाकीच्या डिक्कीतील ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली. खरेदी आटोपून परत आल्यानंतर डिक्कीतील पैसे चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. भरदिवसा व वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, बाजारपेठ, व्यावसायिक ठिकाणे आणि वाहनांच्या पार्किंग परिसरात चोरट्यांचा वावर वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आठवडे बाजारातून दर रविवारी चार ते पाच महागडे मोबाईल चोरीला जातात. अनेक बाजारकरू शर्टच्या वरच्या खिशात मोबाईल ठेवतात आणि चोरट्यांकडून हे मोबाईल लक्ष्य केले जात आहेत. पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *