Headlines

पंतप्रधानांसोबत तुमचे फोटो, अदानींची गाडीही चालवता, त्याचे उत्तर देणार काॽ:मुख्यमंत्र्यांवरील आरोपांवरून डॉ. सुजय विखेंचे आमदार रोहित पवार लक्ष्य




उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करणाऱ्या आमदार रोहित पवार यांना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी थेट तीन सवाल करत लक्ष्य केले. केवळ फोटोंचा आधार लावायचा असेल तर ज्या पंतप्रधानांसोबत तुमचे फोटो आहेत आणि ज्या अदानींवर राहुल गांधी सातत्याने आरोप करतात त्यांची गाडी चालवताना तुम्ही दिसता; त्याचे उत्तर देणाार काॽ असा प्रश्न त्यांनी विचारला. जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. विखे यांनी रोहित पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, अजितदादांच्या अपघाताबाबत किंवा घातपाताबाबत सर्वप्रथम शरद पवार, सुनेत्रा पवार, पार्थ किंवा जय पवार यांनी भूमिका मांडणे अपेक्षित आहे; कुटुंबीयांनीच प्रश्न उपस्थित केलेले नसताना रोहित पवार मुख्यमंत्र्यांवर आरोप का करत आहेत? सहा महिन्यांपूर्वी ईडी कारवाईवेळी केंद्रीय तपास यंत्रणांवर अविश्वास दाखवला जात होता, मग आता सीआयडीऐवजी सीबीआय तपासाची मागणी का केली जात आहे, असा सवालही त्यांनी केला. तसेच, व्हीएसआर कंपनीच्या मालकासोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो दाखवून संबंध जोडले जात असतील, तर पंतप्रधान मोदींसोबतचा आणि अदानींची गाडी चालवतानाचा आ. पवारांचा फोटो दाखवून प्रश्न विचारू, त्याचे उत्तर देणार का, असा पलटवार विखेंनी केला. पद घेताच आक्रमक भूमिका जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच डॉ. सुजय विखे पाटील यांनी थेट रोहित पवारांवर निशाणा साधत जिल्ह्याच्या राजकारणात आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्र्यांची खंबीर बाजू मांडत त्यांनी पक्षश्रेष्ठींविरुद्ध काही ऐकून घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत त्यांनी आगामी राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याचे संकेत दिले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *