![]()
नांदेड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सरकार जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि शेतकऱ्यांचे आर्थिक संरक्षण या तिन्ही आघाड्यांवर प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, या सर्व कामांचा आपण स्वतः नियमित आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, उपलब्ध असलेला जलसाठा शासन नियमाप्रमाणे सर्वप्रथम नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठीच वापरला जाईल, असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच, जिल्ह्यातील ज्या पाणीपुरवठा योजनांची कामे अपूर्ण आहेत किंवा किरकोळ तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे रखडली आहेत, ती तातडीने मार्गी लावून पूर्ण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ग्रीड पाणीपुरवठा योजनांना गती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या १३२ गावे आणि १८३ गावे अशा दोन महत्त्वाच्या ग्रीड पाणीपुरवठा योजनांना लवकरात लवकर मंजुरी मिळण्यासाठी सकारात्मक कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिली. १ लाख ‘जलतारा’ प्रकल्पांचे उद्दिष्ट जिल्ह्यात भूजल पातळी वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना हाती घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्ह्यात १ लाख ‘जलतारा’ प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यापैकी सुमारे ३० हजार प्रकल्पांना यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. यासोबतच कृत्रिम भूजल पुनर्भरणाची १ लाख २७ हजार ६६ कामे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. २०० फुटांपेक्षा खोल बोरवेलवर बंदी भूजल पातळी खालावू नये यासाठी प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र भूजल अधिनियमानुसार नांदेड जिल्ह्यात २०० फुटांपेक्षा अधिक खोल बोरवेल खोदण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. नागरिकांनी आणि कंत्राटदारांनी या नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले आहे. ————— हेही वाचा.. लोणावळ्यातील 4 पंचतारांकित हॉटेल्सचे अन्न परवाने निलंबित: मुदतबाह्य पदार्थ, झुरळे आणि अस्वच्छ स्वयंपाकघरे आढळली; FDAची कारवाई
लोणावळ्यातील दि ऑर्किड, रिदम, द फर्न आणि बेसिलिका या चार पंचतारांकित हॉटेल्सचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तपासणीत मुदतबाह्य खाद्यपदार्थ, झुरळे आणि अस्वच्छ स्वयंपाकघरे आढळली. अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पुणे विभागाने ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत लोणावळ्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची तपासणी केली. अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ आणि स्वच्छतेसंबंधी अनुसूची चारमधील नियमांचे उल्लंघन आढळले. सविस्तर वाचा
Source link
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून नांदेडमध्ये दुष्काळी स्थितीचा आढावा:पिण्याचे पाणी, चारा आणि शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी प्रशासन सज्ज असल्याची दिली माहिती