Headlines

माणसांचा-जनावरांचा जीव वाचवण्यासाठी रेल्वेने पाणी आणण्यात गैर काय?:गरज पडल्यास लातूरला पुन्हा रेल्वेने पाणी देऊ; गिरीश महाजनांचा अमित देशमुखांवर पलटवार




2016 मध्ये लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करणे हे देशमुख कुटुंबीयांना आणि दिवंगत विलासराव देशमुख यांना बदनाम करण्याचे राजकीय षड्यंत्र होते, या काँग्रेस आमदार अमित देशमुख यांच्या आरोपावर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सणसणीत पलटवार केला आहे. “अमित देशमुख यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. तत्कालीन भीषण दुष्काळी परिस्थितीत माणसांचा आणि जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तो निर्णय घेतला होता; यात कोणाचीही बदनामी करण्याचा हेतू नव्हता. आजही लातूरमधील परिस्थिती गंभीर असून, वेळ आली तर पुन्हा एकदा लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात येईल,” असे स्पष्ट प्रत्युत्तर गिरीश महाजन यांनी शनिवारी (21 नोव्हेंबर) माध्यमांशी बोलताना दिले. यावेळी त्यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीतील राजकारण आणि मंगेश चव्हाण-सुमित पाटील वादावरही रोखठोक भाष्य केले. नेमका वाद काय? अमित देशमुखांचे आरोप आणि महाजनांचे प्रत्युत्तर 2016 मधील लातूरच्या जलसंकटावरून काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. 2016 मध्ये लातूरला रेल्वेने पाणी आणण्याचा निर्णय हा राजकीय षड्यंत्राचा भाग होता आणि माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांची प्रतिमा मलिन करण्यासाठीच हे राजकारण केले गेले, असा गंभीर आरोप आमदार अमित देशमुख यांनी केला होता. त्यावेळी बीड, नांदेड आणि धाराशिव हे जिल्हेही दुष्काळाचा सामना करत असताना केवळ लातूरचीच निवड का करण्यात आली, असा सवालही त्यांनी विचारला होता. गिरीश महाजन यांचा प्रतिहल्ला यावर प्रतिक्रिया देताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, “इतक्या वर्षांनंतर रेल्वेच्या पाणीपुरवठ्यावर अशी टीका-टिप्पणी करणे अमित देशमुख यांना शोभत नाही. त्यावेळी लातूरमध्ये नेमकी काय परिस्थिती होती, हे तिथल्या जनतेला विचारले पाहिजे. जनतेची आणि मुक्या जनावरांची तहान भागवण्यासाठी रेल्वेने पाणी आणण्यात गैर काय होते? सध्याही तेथील दुष्काळी परिस्थिती गंभीर असल्याने गरज पडल्यास पुन्हा रेल्वेने पाणीपुरवठा करू.” जिल्हा बँक निवडणुकीत 90 टक्के मतदार आमचेच जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरही गिरीश महाजन यांनी महायुतीची बाजू भक्कम असल्याचे स्पष्ट केले. जिल्हा बँक निवडणुकीत 90 टक्के मतदार हे महायुतीचेच आहेत, त्यामुळे या निवडणुकीत सर्वच 21 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील. मुक्ताईनगर आणि चाळीसगावमध्ये काहीसा तिढा असला, तरी निवडणूक होऊन लढत होऊ द्या; रिंगणात असलेल्या उमेदवारांनी जिल्हाभर फिरून मते मिळवावीत, असे ते म्हणाले. चाळीसगावमध्ये मंगेश चव्हाणांना 85 पैकी 75 मते मिळणार महायुतीत कुठेही वातावरण तापलेले नसून थेट लढत नसल्याने सर्वत्र शांतता आहे. चाळीसगाव मतदारसंघातही आमदार मंगेश चव्हाण यांना एकूण 85 पैकी तब्बल 75 मते निश्चितपणे पडतील, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला. सुमित पाटील यांच्या टीकेवर नाराजी; आमदार किशोर पाटील यांच्याशी चर्चा करणार आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमित पाटील यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर नाव घेऊन केलेल्या वैयक्तिक आरोपांबाबत गिरीश महाजन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिकदृष्ट्या बाद झाला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर कोणीही दडपण आणलेले नाही आणि तसे दडपण आणताही येत नाही. असे असताना सुमित पाटील यांनी खालच्या पातळीवर जाऊन मंगेश चव्हाण यांच्यावर केलेले आरोप अतिशय चुकीचे आहेत, त्यांच्या या बोलण्याचे कोणीही समर्थन करणार नाही. या संदर्भात मी स्वतः आमदार किशोर पाटील यांच्याशी चर्चा करणार आहे,” असेही मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. ——————————————————– हेही वाचा… 60 टक्के कमिशनवाले मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या हाती 5000 रुपयांचा भोपळा देतायत!: शक्तिपीठ महामार्गाचा 80 हजार कोटींचा निधी शेतकऱ्यांना वळवा, हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती, शक्तिपीठ महामार्ग व कुंभमेळ्यातील कथित भ्रष्टाचार, मतचोरीचे प्रकार, डिलिमिटेशन विधेयक आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या रखडलेल्या चौकशीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी (21 नोव्हेंबर) पुण्यात महायुती सरकारवर चौफेर हल्लाबोल केला. “या ’60 टक्के कमिशनवाल्या’ मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचाराचे नवे रेकॉर्ड प्रस्थापित केले आहे. शक्तिपीठ महामार्गासाठी 80 हजार कोटी रुपये आणि कुंभमेळ्यासाठी 33 हजार कोटी रुपयांची उधळपट्टी सुरू असताना, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या हातात केवळ 5000 रुपयांचा भोपळा दिला जात आहे. सरकारने तात्काळ हे दोन्ही निधी थांबवून शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत व संपूर्ण कर्जमाफी द्यावी,” अशी आक्रमक मागणी सपकाळ यांनी केली. पुण्यात काँग्रेस नेते सतेज पाटील आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रभारी श्री. चेल्ला कुमार यांच्या उपस्थितीत आयोजित आढावा बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *