Headlines

Raigad Businessman Shrinivas Bendkhale Dies in Tamhini Ghat Car Accident


माणगाव-पुणे मार्गावरील पुणे हद्दीतील ताम्हिणी घाटात भरधाव कार तब्बल १,२०० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील प्रसिद्ध उद्योजक श्रीनिवास बेंडखळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

.

श्रीनिवास बेंडखळे हे शनिवारी पहाटेपासून आपल्या कारसह बेपत्ता झाले होते. कुटुंबीयांकडून त्यांचा शोध सुरू असताना पोलिस तपासात त्यांच्या मोबाईल आणि वाहनाचे शेवटचे लोकेशन ताम्हिणी घाटात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी आणि स्थानिक बचाव पथकाने तातडीने शोधमोहीम राबवली असता, त्यांची कार तब्बल 1,200 फूट खोल दरीत कोसळलेल्या अवस्थेत आढळून आली.

रात्री उशिरापर्यंत ‘SVRSS’ आणि ‘शेलार मामा’ या रेस्क्यू टीमकडून अत्यंत खडतर परिस्थितीत शोधकार्य सुरू होते. अथक प्रयत्नांनंतर या दोन्ही रेस्क्यू टीमला बेंडखळे यांचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर मृतदेह पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पौड पोलिस प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आला आहे. दरम्यान, कार नेमकी कशी आणि का दरीत कोसळली, या अपघातामागील कारणांचा पुढील तपास पोलिस प्रशासन करत आहे.

हे ही वृत्त वाचा

मनमाडजवळ कंटेनर-कारची समोरासमोर धडक; चौघांचा मृत्यू, सात जण जखमी:गावी जाण्यासाठी रेल्वेस्थानकाकडे निघालेल्या उत्तर प्रदेशातील मजुरांवर घाला

मनमाड-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर मनमाडपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या अनकवाडे शिवारात शनिवारी (२१ नोव्हेंबर) सकाळी आठच्या सुमारास मालवाहू कंटेनर आणि कारची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून, सात जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींवर मनमाड, येवला, मालेगाव आणि नाशिक येथील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. निमाज नियाज शेख (२४), शब्बीना रुज्जू शेख (२०), हाफीज उन्निसा शेख (२५) आणि कलीमुन्नीसा अहमद (३०) हे ठार झाले. वाचा सविस्तर

महाराष्ट्रातील भाविकांचा राजस्थानात अपघात, एकाच कुटुंबातील 9 जण ठार:क्रूझर उभ्या ट्रकला धडकली; खाटूश्यामजीहून परत येत होते

कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्ग-५२ वर शनिवारी मध्यरात्री १:०० च्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला भरधाव वेगातील ‘क्रूझर’ (मल्टी-युटिलिटी वाहन) धडकली. या अपघातात लहान मुलांसह एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेत ट्रक चालकासह इतर सात जण जखमी झाले आहेत. ही घटना नाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंभूपुरा गावाजवळ घडली. अपघातानंतर क्रूझर गाडी पूर्णपणे चक्काचूर झाली होती. मृतदेह आणि जखमी व्यक्ती गाडीच्या आत अडकून पडले होते. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढले आणि ‘न्यू मेडिकल कॉलेज हॉस्पिटल’मध्ये दाखल केले. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.