Headlines

Sunil Tatkare Slams Sanjay Raut & Anandraj Ambedkar Over Controversy


आनंदराज आंबेडकर यांचे वक्तव्य हे अत्यंत निषेधार्ह आहे. मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे; परंतु दिवंगत अजित पवार यांचे महाराष्ट्रासाठी असलेले योगदान आणि त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर देश हळहळला,

.

सुनील तटकरे म्हणाले की, राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत केंद्र सरकारच्या माध्यमातून नक्कीच होईल. यासाठी पाठपुरावा करण्याचे काम मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह आम्ही खासदार म्हणून सर्व जण करत आहोत. राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहील. राज्य सरकारने सुद्धा शेतकऱ्यांना अग्रीम मदत म्हणून 5 हजार रुपयांची मदत दिली आहे.

सुप्रिया सुळेंची डिलिमिटेशनवरील भूमिका स्वागतार्ह

सुनील तटकरे म्हणाले की, स्वतःचे अपयश झाकण्यासाठी दुसऱ्याकडे बोट दाखवण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे संजय राऊत यांची वक्तव्ये ही वैफल्यग्रस्त आहेत. त्यांच्या पक्षाचे किती खासदार फुटले, ते का दूर गेले, याचे आत्मपरीक्षण संजय राऊत यांनी करावे, असे मला वाटते. सुप्रिया सुळे यांनी डिलिमिटेशन बिलासंदर्भात मांडलेली भूमिका स्वागतार्ह आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाचे 5 खासदार आमच्या दुसऱ्या पक्षात जाणार, अशा कपोलकल्पित कथा तयार करण्यावर आम्ही सर्व राजकीय पक्षांनी विचार केला पाहिजे.

भेटीचा राजकीय अर्थ काढणे योग्य नाही

सुनील तटकरे म्हणाले की, राजकारणात वैचारिक मतभेद असू शकतात; पण आपण असे आरोप करत लोकशाहीचेच अवमूल्यन करतो, हे अनेक जण का विसरतात, हे मला समजत नाही. एकनाथ शिंदे हे राज्याचे नेते आहेत. ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांना कोणी आमदार भेटले तर त्यात काही गैर नाही. त्याचा काही राजकीय अर्थ काढायचा नसतो. ते त्यांच्या भागातील प्रश्न घेऊन भेटत असतात, त्याचा राजकीय अर्थ काढणे योग्य नाही.

हे ही वृत्त वाचा

आनंदराज आंबेडकरांचे विधान चुकीचे:टिपू सुलतान कोण, हे सरकारने स्पष्ट करावे, मोदी केवळ ज्ञानेशकुमारांचे पंतप्रधान- संजय राऊत

आनंदराज आंबेडकर यांनी केलेले विधान चुकीचे आहे. दिवंगत व्यक्तीविषयी असे काही बोलू नये; पण सरकारने केलेले विधान सुद्धा चुकीचे आहे. पाऊस पडलाच नाही तर पाणी कुठून आणायचे आणि कुठून जिरवायचे? त्यापेक्षा या सरकारने भ्रष्टाचारातील पैसे अडवा आणि पैसा जिरवा आणि घरी न्या, अशी घोषणा दिली पाहिजे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.