Headlines

पार्थ पवारांचा व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास:आज दुपारी मुंबईवरून पुण्याला आले, अनेकांच्या भुवया उंचावल्या; चर्चांना उधाण




अजित पवार यांच्या अपघाती निधनाला कारणीभूत ठरलेल्या ‘व्हीएसआर’ (VSR Ventures) कंपनीच्या विमानानेच त्यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. एका बाजूला शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार या कंपनीविरोधात आक्रमक भूमिका घेऊन चौकशीची मागणी करत असताना, दुसऱ्या बाजूला खुद्द पवार कुटुंबातील सदस्याने त्याच कंपनीची सेवा घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गत २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ ‘व्हीएसआर’ कंपनीच्या विमानाला भीषण अपघात झाला होता. या दुर्दैवी घटनेत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला होता. या घटनेला आज तीन महिने पूर्ण झालेत. या घटनेनंतर विमानाची देखभाल आणि कंपनीच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आमदार रोहित पवार यांनी या अपघाताला ‘व्हीएसआर’ कंपनीचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे म्हणत वारंवार टीका केली आहे. रोहित पवार यांनी आजच पुण्याच्या सीआयडी (CID) कार्यालयात जाऊन कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांच्याविरोधात गंभीर पुराव्यांसह तक्रार दाखल केली. अजित पवारांचा अपघात हा केवळ योगायोग नसून त्यात घातपाताची शक्यता आहे की काय? इथपर्यंत रोहित पवारांनी संशय व्यक्त केला आहे. पार्थ पवारांचा अनपेक्षित प्रवास एकीकडे रोहित पवार व्ही. के. सिंग आणि ‘व्हीएसआर’ कंपनीला घेरण्याचा प्रयत्न करत असताना, दुसरीकडे अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी त्याच कंपनीच्या विमानातून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. आज दुपारी त्यांनी मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी याच कंपनीची सेवा घेतली. वडिलांचा ज्या कंपनीच्या विमान अपघातात मृत्यू झाला, त्याच कंपनीवर पार्थ पवारांनी दाखवलेला हा विश्वास राजकीय विश्लेषकांसाठी कोडं ठरत आहे. चर्चा आणि संभ्रम अजित पवारांच्या मृत्युला कारणीभूत म्हटल्या जाणाऱ्या व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास करण्यामागे पार्थ पवारांचा नेमका काय उद्देश होता? हा केवळ योगायोग आहे की रोहित पवारांच्या आरोपांना दिलेले मूक प्रत्युत्तर? अशा चर्चांना आता उधाण आले आहे. या संदर्भात अद्याप पार्थ पवार किंवा पवार कुटुंबाकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र, या एका प्रवासाने ‘व्हीएसआर’ कंपनीच्या चौकशीला आणि त्यावरून सुरू असलेल्या राजकारणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. हे ही वाचा… रोहित पवारांचे CID च्या रिकाम्या खुर्चीला निवेदन:रिकाम्या खुर्चीलाच जबाब नोंदवून घेण्याची मागणी; अघोरी पूजेविषयी बारामतीच्या नेत्याचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूविषयी येथील सीआयडी कार्यालयाला भेट दिली. यावेळी कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी नसल्यामुळे त्यांनी रिकाम्या खुर्चीला निवेदन देऊन बीएनएसएस कलम 180 अंतर्गत आपला जबाब नोंदवण्याची विनंती केली. त्यांच्या या गांधीगिरीची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी यावेळी भोंदू अशोक खरातच्या सल्ल्यानुसार, अजित पवार गटाच्या बारामती येथील एका नेत्याने अजित पवारांच्या काटेवाडी येथील घराबाहेर पूजा केल्याचाही आरोप केला. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *