Headlines

Rohini Khadse & Fauzia Khan Slam Govt Over Drought & Land Policy


राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महिलांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्या जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार गट) महिला आघाडीने राज्यव्यापी ‘जनसंवाद’ दौरा सुरू केला आहे. विदर्भातील 11 जिल्ह्यांचा दौरा आटोपल्यान

.

विदर्भातील 11 जिल्ह्यांत 12000 महिलांचे फॉर्म भरले; 2 महिन्यांत सरकारला धोरणात्मक अहवाल देणार – फौजिया खान

दुष्काळाच्या झळा सर्वाधिक महिलांनाच सोसाव्या लागतात, मात्र सरकारी आपत्ती धोरणात महिलांचा स्वतंत्र विचारच केला जात नसल्याचे फौजिया खान यांनी निदर्शनास आणून दिले. आम्ही विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांचा दौरा केला, मात्र एकाही गावात रोजगार हमी योजनेची (मनरेगा) कामे सुरू असल्याचे दिसले नाही. पुरुष कामासाठी शहरांत स्थलांतरित झाल्याने घराची व मुलांची सर्व जबाबदारी महिलांवर आली आहे. खेड तालुक्यातील गुळाणी गावातील महिलांनी तर टँकरचे अस्वच्छ पाणी प्यावे लागत असल्याने आजारपण वाढल्याची व्यथा मांडली, तर पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने मुलींचे शिक्षण थांबले आहे.

प्रत्येक तालुक्यातील 5 गावांत सर्वेक्षण

सरकारने करायचे सर्वेक्षणाचे काम राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने हाती घेतले आहे. प्रत्येक तालुक्यातील 5 गावांमध्ये जाऊन प्रत्येकी 20 ते 25 घरांतील महिलांचे फॉर्म भरून घेतले जात आहेत. विदर्भातून आतापर्यंत 12000 फॉर्म जमा झाले आहेत. पुण्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर आणि त्यानंतर मराठवाड्याचा दौरा पूर्ण करून पुढील 1 ते 2 महिन्यांत सविस्तर ‘पॉलिसी डॉक्युमेंट’ शरद पवार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना सादर केले जाईल.

स्मार्ट मीटरची लूट थांबवा; पूर्ण वार्षिक शैक्षणिक शुल्क माफ करा

महिला घरी नसतानाही सक्तीने ‘स्मार्ट मीटर’ बसवून अवाढव्य वीजबिले पाठवली जात आहेत, ती तात्काळ बंद करावीत. तसेच, शरद पवार यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत देण्याची मागणी केली होती; पण सरकारने दिवाळीआधी केवळ 5000 रुपये जाहीर केले आणि तेही अद्याप मिळालेले नाहीत. विद्यार्थ्यांची पूर्ण वार्षिक फी माफ करण्याऐवजी केवळ 100 ते 200 रुपयांची परीक्षा फी माफ करून सरकारने बोळवण केली आहे.

अटींशिवाय महिला आरक्षण लागू करा

संसदेत सर्वानुमते मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकाला डिलिमिटेशनची जाचक अट घालून सरकारने महिलांचा हक्क रोखून धरला आहे. तसेच, राज्यात गेल्या 8 महिन्यांपासून राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त आहे, ते तातडीने भरावे.

80 लाख महिलांना ‘लाडकी बहीण’मधून अपात्र केले – रोहिणी खडसे

महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर कडाडून टीका केली. निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेतून आता कागदपत्रांच्या त्रुटी दाखवून तब्बल 80 लाख महिलांना अपात्र करण्यात आले आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि उदरनिर्वाहासाठी खरोखर गरज असलेल्या महिलांनाच वंचित ठेवले जात असल्याने ही योजना केवळ निवडणुकीपुरती होती का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पडीत जमिनी सरकार जमा करण्यास तीव्र विरोध

दुष्काळामुळे गेल्या 2 वर्षांपासून शेतीतून उत्पन्न मिळत नसताना व पाण्याची व्यवस्था नसताना, 3 वर्षे जमीन पडीत राहिल्यास ती सरकार जमा करण्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधान शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे. सरकारने असा कोणताही निर्णय घेतल्यास त्याला तीव्र विरोध करू.

रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चात सहभागी होणार

नागपूर हिवाळी अधिवेशनावर आमदार रोहित पवार काढत असलेल्या शेतकरी मोर्चात विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

महिला सुरक्षेसाठी पर्समध्ये शस्त्र बाळगण्याची वेळ

राज्यात महिलांवरील अत्याचार आणि घरात घुसून दरोडे पडण्याचे प्रमाण वाढले आहे. सरकार महिलांचे रक्षण करण्यात अपयशी ठरल्याने महिलांनी स्वसंरक्षणासाठी पर्समध्ये छोटे शस्त्र बाळगणे गरजेचे झाले आहे.

ट्रेडमार्क वाद आणि भोंदू बाबांच्या चित्रपटावरून रोहिणी खडसेंचा टोला

“माझ्यासारखी साडी घालू नये किंवा वावरू नये यासाठी कोणीही ट्रेडमार्क मागू शकत नाही. ट्रेडमार्क हा वस्तूसाठी असतो, व्यक्तीसाठी नाही; कोणी स्वतःला वस्तू समजत असेल तर हा सावित्रीमाईंच्या विचारांचा आणि स्त्रीत्वाचा अपमान आहे,” अशा शब्दांत रोहिणी खडसे यांनी नाव न घेता टीका केली. तसेच, भोंदू बाबांकडून होणाऱ्या महिलांच्या शोषणावर जनजागृती करणाऱ्या आगामी चित्रपटाला होणाऱ्या विरोधावर भाष्य करताना, “हा चित्रपट महिलांच्या हिताचा असेल तर तो नक्की प्रदर्शित व्हावा. त्याला विरोध करणाऱ्यांना कशाची भीती वाटतेय? ‘कहीं तो दाल में कुछ काला है, या पूरी दाल ही काली है,'” असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, डिलिमिटेशन विधेयकाबाबत खा. सुप्रिया सुळे यांनी मांडलेल्या भूमिकेवर विचारले असता, सुप्रियाताई पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा असून प्रत्यक्ष विधेयक संसदेत आल्यावर पक्षाची सविस्तर भूमिका स्पष्ट होईल, असे फौजिया खान यांनी स्पष्ट केले.

——————————–

हेही वाचा…

डिलिमिटेशनसाठी 150 कोटींचे आरोप बालिशपणाचे, मग सुळेंनाही पैसे दिले का?: आरोप खोटे निघाल्यास नार्वेकर राऊतांना समज देतील- संजय शिरसाट

राहुल नार्वेकरांनी जबरदस्तीने काही जमिनी बळकावल्या असल्याच्या तक्रारी जर संजय राऊत यांच्याकडे आल्या असतील आणि त्या अनुषंगाने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले असेल, तर मुख्यमंत्री त्यावर नक्कीच चौकशी करतील. परंतु, हे आरोप खोटे निघाले, तर नार्वेकर हे स्वतः वकील आहेत, ते राऊतांना योग्य ती समज देतील, असे प्रत्युत्तर मंत्री संजय शिरसाट यांनी दिले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.