Headlines

स्टारगेझर क्लबने आकाशात झेपावला प्रकाश:‘व्हॉयेजर-1’ च्या ऐतिहासिक लाइट-डे टप्प्यानिमित्त प्रयाेग ठरला लक्षवेधी




‘नासा’चे व्हॉयेजर-१ हे अंतराळयान गेल्या ४९ वर्षांपासून अवकाशात अविरत प्रवास करित आहे. या यानाने पाच दिवसांपूर्वी पृथ्वीपासून तब्बल एक प्रकाश-दिवस अंतर गाठले आहे. मानवाने निर्माण केलेली कोणतीही वस्तू आजवर इतक्या दूर पोहोचलेली नाही. त्यामुळे तो दिवस ”लाइट-डे” म्हणून साजरा करताना मराठी विज्ञान परिषदेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपल्या मोबाइलचा प्रकाश आकाशाच्या दिशेने झेपावला. छत्री तलाव रोडवरील गणेश विसर्जन मैदानात हा सायंकाळी ६.३० वाजतानंतर हा उपक्रम राबवण्यात आला. नासाने यासाठी मोबाइलवर वापरता येणारे स्वयंचलित फ्लॅशर टूलही उपलब्ध करून दिले होते. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे पृथ्वीवरून दिलेला रेडिओ संदेश व्हॉयेजर-१ पर्यंत पोहोचण्यासाठी २४ तास लागतात. त्यामुळे १७ नोव्हेंबर रोजी दिला जाणारा हा प्रकाश संदेश १८ नोव्हेंबरच्या ऐतिहासिक टप्प्याच्या स्वागताचे प्रतीक ठरला. विशेष म्हणजे व्हॉयेजर-१ चे कॅमेरे १९९० मध्येच बंद करण्यात आल्याने त्याला हा प्रकाश प्रत्यक्ष पाहता आला नाही. मात्र हा उपक्रम मानवाच्या वैज्ञानिक प्रगतीचा आणि अंतराळ संशोधनातील अदम्य जिद्दीचा गौरव करणारा प्रतीकात्मक जागतिक उत्सव जरुर ठरला, असे मत मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. प्रवीण गुल्हाने आणि खगोलीय विभाग प्रमुख विजय गिरुळकर यांनी व्यक्त केले. अशी करायची होती कृती मॉर्स कोडनुसार ”V” साठी तीन छोटे व एक मोठा प्रकाशझोत, ”G’ साठी दोन मोठे व एक छोटा प्रकाशझोत, तर Rसाठी एक छोटा, एक मोठा व पुन्हा एक छोटा प्रकाशझोत द्यायचा होता. अशा प्रकारे व्हॉयेजरला मानवतेचा प्रतीकात्मक संदेश दिला जावा, असे त्यामागचे उद्दीष्ट होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *