Headlines

Suraj Chavan Slams Supriya Sule Over Pune Guardian Minister Demand


पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सर्वेक्षणाचा दाखला देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे पालकमंत्रिपद स्वीकारावे, अशी मागणी केली होती. या मागणीचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूर

.

पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून सक्षमपणे काम करत असून विरोधकांनी गुन्हेगारीचे राजकारण करू नये, असेही त्यांनी सुनावले. यासोबतच मुंबईतील गोळीबार, शहीद तुकाराम ओंबळे स्मारकातील भ्रष्टाचाराचे आरोप, मनोज जरांगे पाटील यांची 500 कोटींच्या आरोपांप्रकरणी झालेली एसआयटी (SIT) चौकशी आणि बुलढाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊ नगर’ करण्याच्या ठरावावरही या पत्रकार परिषदेत महत्त्वाची भूमिका मांडण्यात आली.

सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात पुणे सुरक्षित

पुण्यातील गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला सूरज चव्हाण यांनी सडेतोड उत्तर दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संपूर्ण राज्याचे प्रमुख आहेत, त्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे पालकत्व आहे; ते एका जिल्ह्यापुरते मर्यादित नाहीत. ही साधी गोष्ट सुप्रिया सुळे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला नक्कीच माहीत आहे. मात्र, केवळ राजकीय सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशी विधाने केली जात आहेत.

वहिनींच्या कामाची पद्धत अजितदादांसारखीच

प्रत्येक जिल्ह्याची टक्केवारी काढल्यास काही ठिकाणी गुन्हेगारी कमी झाली आहे, तर काही ठिकाणी वाढली आहे. पुण्यात सुनेत्रा पवार या अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत आहेत. कोणतीही घटना घडताच त्या स्वतः घटनास्थळी जाऊन प्रशासनाला कठोर कारवाईचे आदेश देतात. सध्या देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे तिन्ही नेते महाराष्ट्राला 3 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी एकत्र काम करत असल्यानेच सुप्रिया सुळे यांचा आमच्याबद्दलचा दृष्टिकोन बदलत चालला आहे.

मुंबईतील गोळीबार दुर्दैवी; पुणे, बीड आणि मुंबईतील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा ॲक्शन प्लॅन

पुण्यानंतर मुंबईतील दादर भागात झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर सूरज चव्हाण यांनी चिंता व्यक्त करत कठोर कारवाईचा विश्वास व्यक्त केला. पुण्यातील घटना असो, बीडमधील प्रकार असो वा मुंबईतील गोळीबार; या घटना अत्यंत दुर्दैवी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणाऱ्या आहेत. मुंबई पोलिसांचा जगभरात जो नावलौकिक आहे, तो अबाधित राहण्यासाठी आणि शस्त्रे कोठून येतात याचा मुळाशी जाऊन शोध घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्कीच विशेष ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शहीद तुकाराम ओंबळेंच्या स्मारकातील आरोपांची चौकशी करू

26/11 दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतिदिनी सूरज चव्हाण यांनी शहीद तुकाराम ओंबळे यांच्यासह सर्व हुतात्मा जवानांना अभिवादन केले आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर भाष्य केले. शहीद तुकाराम ओंबळे यांच्या गावी उभारल्या जाणाऱ्या स्मारकाच्या निधीत त्यांचे चुलत भाऊ एकनाथ ओंबळे यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप तुकाराम ओंबळे यांच्या मुलीने केला आहे. या आरोपांमध्ये नेमके किती तथ्य आहे की ते जाणीवपूर्वक केले गेले आहेत, याची सखोल तपासणी करून आमचे सरकार नक्कीच योग्य ती कारवाई करेल.

500 कोटींच्या आरोपांवर एसआयटी चौकशीतून सत्य समोर येईल

मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटी रुपयांचा आरोप करत एसआयटीकडे पेनड्राईव्ह सुपूर्द केला असून त्यांची चौकशी झाली आहे. जरांगे पाटील यांनी स्वतः या चौकशीला सामोरे जाऊन सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या आरोपांमागे काही राजकारण आहे की खरोखरच तथ्य आहे, याचे संपूर्ण सत्य एसआयटीच्या चौकशीनंतर महाराष्ट्रासमोर येईल.

बुलढाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊ नगर’ करा

या पत्रकार परिषदेत महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुलढाणा जिल्ह्याच्या नामांतराची आणि 450 कोटींच्या मातृतीर्थ विकास आराखड्याची महत्त्वाची मागणी करण्यात आली. नुकत्याच झालेल्या पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बुलढाणा जिल्ह्याचे नामकरण ‘राजमाता जिजाऊ नगर’ करण्यात यावे, असा प्रमुख ठराव मंजूर करण्यात आला आहे. लोकनेते अजित पवार यांनी सिंदखेड राजा येथील मातृतीर्थाच्या विकासासाठी तब्बल 8 तास देऊन 450 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला होता व त्याला प्राथमिक मंजुरीही दिली होती.

चौंडीच्या धर्तीवर 12 जानेवारीला विशेष मंत्रिमंडळ बैठक घ्यावी

गेल्या वर्षी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मस्थानी चौंडी येथे जशी विशेष कॅबिनेट बैठक आयोजित करून विकासाला चालना दिली गेली, त्याच धर्तीवर येत्या 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त मातृतीर्थ येथे विशेष मंत्रिमंडळ बैठक आयोजित करून अजितदादांचे स्वप्न साकार करावे, असे निवेदन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिले जाणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

————————————————-

हेही वाचा…

राज्यात ज्याच्याकडे ‘मॅजिक नंबर’, तोच मुख्यमंत्री होऊ शकतो:मी कुणाची लेक आहे विसरू नका, सुप्रिया सुळेंची रोखठोक भूमिका; प्रकाश आंबेडकरांनाही प्रत्युत्तर

“मी कोणाची लेक आहे हे विसरू नका, मी वास्तवतेत जगते. शरद पवार यांची गेल्या 40 वर्षांतील वक्तव्ये काढून पाहा; राज्यात ज्याच्याकडे ‘मॅजिक नंबर’ असतो, तोच मुख्यमंत्री होऊ शकतो. एखाद्याने काहीतरी बालिश लिहिले म्हणून मी अशा ‘गॉसिप’मध्ये वेळ घालवणार नाही,” अशा सडेतोड शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांवर आणि शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांच्या विधानावर गुरुवारी (26 नोव्हेंबर) मुंबईत प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या राज्यस्तरीय दुष्काळ आढावा बैठकीपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गृह मंत्रालयाच्या आकडेवारीचा दाखला देत, महाराष्ट्रात गुन्हेगारीत पुणे शहर नंबर 1 वर असल्याची चिंता व्यक्त केली. यासोबतच त्यांनी 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी, प्रकाश आंबेडकर व अंजली आंबेडकर यांनी केलेली टीका आणि राष्ट्रवादी पक्ष-चिन्हाच्या न्यायालयीन लढाईवर आपली स्पष्ट भूमिका मांडली. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.