![]()
भारतीय जनता पार्टीने डिसेंबर महिन्यासाठी देशभरात विशेष मोहीम आखली असून, त्याची पूर्वतयारी आता कोकण आणि ठाणे विभागात सुरू झाली आहे. येत्या 1 ते 25 डिसेंबर 2026 या कालावधीत भाजपच्या वतीने ‘सेवा दूत अभियान’ राबविण्यात येणार आहे. याच ‘डिसेंबर प्लॅन’ची रण
.
रविंद्र चव्हाण बैठकीत नेमकं काय म्हणाले?
या कार्यशाळेत अभियानाची कार्यपद्धती, सूक्ष्म नियोजन आणि त्याच्या अंमलबजावणीवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी मार्गदर्शन करताना रविंद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांमधील परस्पर समन्वयावर विशेष भर दिला.
रवींद्र चव्हाण म्हणाले की, “समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेणे आणि त्यांना आवश्यक ते सहकार्य करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. यासोबतच केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवायची आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे.”
ठाणे-कोकणातील प्रमुख नेत्यांची हजेरी
पनवेलमध्ये पार पडलेल्या या विभागीय कार्यशाळेला ठाणे आणि कोकण विभागातील प्रमुख नेते व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये प्रदेश सरचिटणीस आ. माधवीताई नाईक, खासदार डॉ. हेमंत सवरा, खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार प्रमोद जठार, आमदार विक्रांत पाटील आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांचा समावेश होता. तसेच दोन्ही विभागातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीला हजर होते.