पुण्यातील मंदार किवळे हल्ला प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे पालकमंत्रिपद स्वतःकडे घ्यावे, अशी मागणी केली आहे. या प्रकरणावर भाष्य क
.
रोहित पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मी बारामतीकर आहे, पुणे जिल्ह्याचा नागरिक आहे. एक पुणेकर नागरिक म्हणून मी अजित पवारांना पालकमंत्री म्हणून पाहिले आहे. पुणे शहर, ग्रामीण आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना पाहिले आहे. त्यामुळे मी पालकमंत्रीपदाबाबत माझे मत मांडले होते. माझ्या आक्रमक शब्दांमुळे सुनेत्रा वहिनींना वाईट वाटले असेल तर त्यांची व्यक्तीगत माफी मागतो. मात्र मी चुकीचे बोललो नाही, असे पवार यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, भाजपसोबत अजित पवारांचा पक्ष गेला तेव्हापासून पुणे सीपी केवळ भाजपचेच ऐकतात. मी म्हणालो सुनेत्रा पवारांना ताकद द्या, मुख्यमंत्र्यांचा आदर आहे, मात्र गुन्हेगारीचा विषय मोठा आहे. बलात्कार, विनयभंग, कोयत्याने मारामारी होत आहेत. अशा घटना घडत आहेत, त्यामुळे मी भावनिक होऊन बोललो, असे स्पष्टीकरण पवार यांनी दिले आहे.
पुण्याचे सीपी सुनेत्रा पवारांचे ऐकतात का?
तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना रोहित पवार म्हणाले, अजितदादा असताना पुण्यावर त्यांचा वाचक होता. आता पुणे सीपी सुनेत्रा पवारांचे ऐकतात का हा प्रश्न आहे. आम्ही राजकारण करत नाही जे सत्य आहे ते मांडत आहोत. पवारांच्या घरातला व्यक्ती म्हणून बोलतोय, काही अधिकारी फक्त भाजपच्या लोकांचेच ऐकतात. बाकी कोणाचे ते ऐकत नाहीत. साताऱ्यात देखील एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना तिथल्या एसपीने बाहेर ढकलले होते हा इतिहास आहे, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांना उद्देशून टीका केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळेंना पलटवार
दरम्यान, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोहित पवार पिसाळले असल्याची टीका केली होती. त्यावर रोहित पवारांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की, आमच्या सारखे लोकप्रतिनिधी पिसाळल्यासारखे काम केल्याशिवाय शांत बसणार नाही. तुमच्या नेत्याला बोललो म्हणून तुमच्या पोटात दुखत असेल तर त्याला आम्ही काही करू शकत नाही, असे म्हणत त्यांनी पलटवार केला आहे.
या संदर्भातील ही देखील बातमी वाचा..
पुण्याचे पालकमंत्रिपद मुख्यमंत्र्यांना देऊ नका, अन्यथा वाटोळे होईल:रोहित पवारांची टीका, म्हणाले- नागपूरवर शेतकरी-शेतमजुरांचा ट्रॅक्टर मोर्चा निघणारच

“सुप्रियाताईंनी सहज बोलता-बोलता म्हटले की सुनेत्रा काकींना अजितदादांसारखे काम जमत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी पुण्याचे पालकत्व घ्यावे; मात्र एक पुणेकर नागरिक म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की, पुण्याचे पालकमंत्रिपद कृपा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देऊ नका, अन्यथा पुण्याचे वाटोळे होईल,” अशा खरमरीत शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी (26 नोव्हेंबर) मुंबईत माध्यमांशी बोलताना टीकास्त्र सोडले. वाचा सविस्तर