Headlines

‘रोहित पवारांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला’: सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, काय म्हणाले बावनकुळे?



पुण्यातील मंदार किवळे हल्ला प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे पालकमंत्रिपद स्वतःकडे घ्यावे, अशी मागणी केली आहे. या प्रकरणावर भाष्य क

.

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, रोहित पवार हे राज्याचे संस्कार, संस्कृती विसरले आहेत. सुनेत्राताई पवार यांना प्रशासन चालवता येत नाही. त्यांना पालकमंत्री पद सांभाळता येत नाही, असे बोलणे हे रोहित पवार यांना शोभत नाही. सुनेत्रा पवार या आदर्श, संस्कारमय, प्रशासनाची जाण असलेल्या नेत्या आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी पक्षावर, सरकारवर एक पकड तयार केली आहे. त्या आपल्या खात्याचे काम चांगल्या पद्धतीने करत आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, असे प्रत्युत्तर बावनकुळे यांनी दिले आहे.

रोहित पवारांनी स्वतःची पत घालवून घेतली

पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, सुनेत्रा पवार राजकारणात कधी एवढ्या सक्रिय नव्हत्या. अनेकजण 25-25 वर्षे आमदार, खासदार राहूनही अनेकांना प्रशासनावर नियंत्रण मिळवता येत नाही. परंतु खूप कमी काळात सुनेत्रा पवार यांनी प्रशासनावर पकड मिळवली आहे. रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्याविषयी अशा पद्धतीने बोलणे राज्यातील जनतेला मान्य नाही. सुनेत्रा पवार यांनी पुण्यात अत्यंत चांगल्या पद्धतीने काम सुरू केले आहे. रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्याबद्दल अशा पद्धतीने बोलून स्वतःची पत घालवून घेतली आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.

रोहित पवार पिसाळल्यासारखे वागतायत

दरम्यान, रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना म्हटले की, पुण्याचे पालकमंत्री फडणवीस झाले तर जिल्ह्याचे वाटोळे होईल, अशी टीका त्यांनी केली. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर देत म्हटले की, रोहित पवार पिसाळल्यासारखे वागत आहेत. तसेच सुप्रिया सुळे यांना राजकारणाचा खूप अनुभव आहे. सुप्रिया सुळे या देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवतात. परंतु राजकारणासाठी प्रत्येक ठिकाणी टीका करणे योग्य नाही, अशा शब्दांत बावनकुळे यांनी सुनावले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्री होणार नाहीत. तसे पाहायचे झाले तर सुनेत्रा पवार या सक्षम आहेत, असेही बावनकुळे यांनी म्हटले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *