पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयाबाहेर बुधवारी (25 नोव्हेंबर) दुपारी 12.45 ते 1.15 वाजण्याच्या सुमारास जामिनावर सुटलेला आरोपी मंदार मारुती किवळे (वय 35, रा. नवीन वसाहत, कात्रज) याच्यावर गोळीबार आणि कोयत्याने सपासप वार करून दोन्ही हातांचे पंजे छाटल्य
.
हल्ल्याची इनसाईड स्टोरी
पुणे पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत आणि पहाटेपर्यंत मोहीम राबवून एकूण 6 जणांना ताब्यात घेतले आहे, त्यामध्ये एका अल्पवयीन बालकाचाही समावेश आहे.
- अक्षय सुभाष चव्हाण (वय 20 वर्षे — मुख्य सूत्रधार)
- अमोल रामचंद्र चव्हाण (वय 48 वर्षे — मुख्य सूत्रधार)
- स्वप्निल बाजीराव गवळी (वय 28 वर्षे)
- ओंकार संतोष पवार (वय 18 वर्षे)
- सूरज साधू मालेकर (वय 22 वर्षे)
- एक विधीसंघर्षग्रस्त बालक (अल्पवयीन मुलगा)

आरोपी हल्ला करताना प्रत्यक्षदर्शींच्या कॅमेऱ्यात कैद झाले होते.
पुणे ते दौंड नाकाबंदी करून अटक
घटनेनंतर आरोपी 2 दुचाकींवरून (एका दुचाकीवर 3 तर दुसऱ्या दुचाकीवर 2-3 जण) पसार झाले आणि पुढे दौंडमार्गे सोलापूरच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत होते. पुणे गुन्हे शाखेने (Crime Branch) तात्काळ सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे महामार्गावरील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क केले. सूत्रधार अक्षय व अमोल चव्हाण यांना पुण्यातून, तर 3 हल्लेखोरांना दौंड परिसरात सापळा रचून अटक करण्यात आली.
घटनास्थळाची काही दृश्ये

आरोपींची बंदूक घटनास्थळावर आढळली.

आरोपींनी येथेच तरुणाला घेरून कोयत्याने जीवघेणा हल्ला केला.
तूच आमच्या शुभमला मारलं ना? – मंदार किवळेच्या जबाबातून थरार उघड
ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी मंदार किवळे याने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत आणि जबाबात हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम कथन केला आहे.
गोळी चुकली, मग कोयत्याने दोन्ही हातांचे पंजे छाटले
20 एप्रिल 2025 च्या शुभम चव्हाण हत्या प्रकरणात तुरुंगात असलेला मंदार किवळे हा 18 नोव्हेंबर 2026 रोजी जामिनावर बाहेर आला होता. बुधवारी दुपारी 12.45 वाजता न्यायालयीन कामासाठी तो शिवाजीनगर कोर्टाबाहेर आला असता हल्लेखोरांनी त्याला गाठले. दोन जणांनी “आधी मला सांग, तूच आमच्या शुभमला मारलं ना?” असे विचारत पिस्तुलातून गोळी झाडली. मात्र ती गोळी लागली नाही. त्यावेळी दुचाकीवर बसलेल्या एकाने “याच्या डोक्यात कोयते टाका” असा आदेश दिला आणि इतर हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले, ज्यात त्याच्या दोन्ही हातांचे पंजे तुटले.
आम्ही कात्रजचे राजे, नादी लागू नका म्हणत पलायन
हल्ल्यानंतर आरोपींनी हवेत कोयते फिरवत “शुभम दादा, तुझ्या खुनाचा आम्ही बदला घेतला आहे; आम्हीच कात्रजचे भाई आणि राजे आहोत, आमच्या नादाला कोणी लागू नका” अशी घोषणाबाजी करत पळ काढला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, सुरुवातीला पंक्चरवाल्याशी किरकोळ वाद सुरू असल्याचे वाटले; मात्र मंदार रक्तबंबाळ होऊन खाली कोसळताच नागरिकांनी माणुसकीच्या नात्याने त्याची विचारपूस केली, तेव्हा त्याने आपले नाव मंदार किवळे (रा. कात्रज) असल्याचे सांगितले.
अर्ध्या गुंठा जमिनीच्या वादातून सुरू झालेले टोळीयुद्ध!
कात्रज येथील संतोषनगर परिसरातील 2 गुंठे जमिनीपैकी अर्ध्या गुंठ्याच्या मालकीवरून 2025 मध्ये हे वैर सुरू झाले होते. संतोषनगरमध्ये राहणारा आणि तिथेच रेस्टॉरंट चालवणारा शुभम सुभाष चव्हाण (वय 28) आणि अमर दिलीप साकोरे यांच्यात घराशेजारील अर्ध्या गुंठा जागेवरून वाद होता. या वादातून मंदार किवळे, अमर साकोरे, गिरीष सुभाष वावरे आणि योगेश बाबूराव डोरे या 4 जणांनी लाकडी बांबू, ओंडके आणि स्टंपने बेदम मारहाण करून शुभम चव्हाणचा खून केला होता. तेव्हा आंबेगाव पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कामती येथून या चौघांना अटक केली होती. भावाच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ घेतलेल्या अक्षय चव्हाणने मंदार जामिनावर सुटताच 5 ते 6 दिवसांत हा कट तडीस नेला.
मुख्यमंत्री फडणवीसांची नाराजी
भरदिवसा न्यायालयाच्या दारात घडलेल्या या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. पुणे आणि मुंबईतील गोळीबाराच्या घटनांवर मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली असून, अशा घटना अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा कडक इशारा दिला आहे.
दोषींना पाठीशी घालणार नाही – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
ही घटना अत्यंत दुर्दैवी व गंभीर असून दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही. अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आणि गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्याचे आदेश पोलिसांना दिले असल्याचे पुण्याच्या पालकमंत्री व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी पुण्याचे पालकत्व घ्यावे – खासदार सुप्रिया सुळे
पुणे हे विद्येचे माहेरघर व सुरक्षित शहर म्हणून ओळखले जाते; मात्र गुन्हेगारीत महाराष्ट्र देशात 1 ल्या तर पुणे शहर 4 थ्या क्रमांकावर आहे. मला पोलिसांचा अभिमान आहे, पण पुण्यात आल्यावर त्यांना काय होते हे समजत नाही; त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुण्याचे पालकत्व घेऊन ही गुन्हेगारी थांबवावी, अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
———————————————–
हेही वाचा…
भावाच्या मृतदेहासमोरच घेतली होती बदल्याची शपथ: 2025चे ते प्रकरण काय? ज्यामुळे पुण्यात कोर्टाबाहेरच मंदार किवळेवर झाला जीवघेणा हल्ला

पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयाबाहेर बुधवारी (25 नोव्हेंबर) दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास मंदार मारुती किवळे (वय 35) या तरुणावर झालेल्या गोळीबार आणि कोयत्याच्या जीवघेण्या हल्ल्यामागे एका वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. 2025 मध्ये कात्रज येथील संतोषनगरमध्ये हत्या झालेल्या शुभम चव्हाण याच्या मृतदेहासमोरच त्याचा सख्खा भाऊ अक्षय चव्हाण आणि मित्रांनी बदला घेण्याची शपथ घेतली होती. मंदार किवळे हा 4 ते 5 दिवसांपूर्वीच जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्याची माहिती मिळताच अक्षय चव्हाण याने 12 ते 15 तरुणांना एकत्र करून हा संपूर्ण कट रचला आणि कोर्टाबाहेर त्याला गाठून कोयत्याने सपासप वार करत त्याचे दोन्ही हात शरीरापासून वेगळे केले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 9 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, ताब्यात घेतलेल्या 6 आरोपींची पहाटे 5 वाजता ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे; आज दुपारी 2 वाजता त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी