Headlines

मिशन ऑलिम्पिक 2036: राज्यात तळागाळातील खेळाडू घडवण्यासाठी ‘क्रीडा संग्राम’चा नवा पॅटर्न; 75 हजार खेळाडू मैदानात – Maharashtra Krida Sangram: Talent Hunt For Olympic Mission 2036



भारताचे 2036 च्या ऑलिम्पिक यजमानपदाचे स्वप्न साकार करण्यासाठी आता राज्यात तळागाळातील खेळाडू घडवण्याची व्यापक चळवळ सुरू झाली आहे. याचाच एक भाग म्हणून कल्याण, ठाणे आणि भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघांतील 32 हून अधिक मैदानांवर सध्या ‘खासदार क्रीडा संग्रा

.

तीन लोकसभा मतदारसंघांत विस्तार

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा गतवर्षी केवळ कल्याण लोकसभा मतदारसंघापुरती मर्यादित होती. यंदा ती कल्याण, ठाणे आणि भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघांतील 32 हून अधिक मैदानांवर विस्तारली आहे. 20 नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डोंबिवलीत या स्पर्धेचे उद्घाटन झाले होते. स्पर्धेत पारंपरिक मल्लखंब, लंगडी, आट्यापाट्या, गतका यांच्यासोबतच पिकलबॉल, पेटांक, रायफल शूटिंग आणि तायक्वांडोसारख्या आधुनिक व ऑलिम्पिक खेळांचा समावेश आहे. सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र आणि मैदानावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात उभारणार कायमस्वरूपी क्रीडा संकुले

केवळ स्पर्धा आयोजित न करता कायमस्वरूपी क्रीडा पायाभूत सुविधा उभारण्याचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. अंबरनाथच्या नेताजी सुभाषचंद्र बोस संकुलात नवे फुटबॉल व ॲथलेटिक्स मैदान खुले झाले असून, ऑलिम्पिक दर्जाच्या जलतरण तलावाचे भूमिपूजनही पार पडले आहे. याशिवाय डोंबिवली-कळवा येथे व्हर्टिकल क्रीडा संकुल, अंबरनाथ-कल्याणमध्ये शूटिंग रेंज आणि उल्हासनगरमध्ये मिनी स्टेडियम उभारण्याचे नियोजन आहे.

अंतिम सामन्यांचे वेळापत्रक (26 ते 29 नोव्हेंबर)

26 नोव्हेंबर: राबोडीत व्हॉलीबॉल, शहाडमध्ये रग्बी, तर डोंबिवलीत हँडबॉल व ज्युदोच्या लढती. 27-28 नोव्हेंबर: महिला क्रिकेट, बॅडमिंटन, बास्केटबॉल, जिम्नॅस्टिक्स व जलतरणचे पदक सामने. 29 नोव्हेंबर (अंतिम दिवस): डोंबिवलीत कबड्डी, खो-खो, बॉक्सिंग व बॉक्स क्रिकेटचे महाअंतिम सामने; मुंब्रा-कौसा येथे रस्सीखेच व फुटबॉल फायनल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *