![]()
पुणे पोलिसांनी बुधवारी (२५) रात्री १० ते गुरुवारी पहाटे १ वाजेपर्यंत ऑल आऊट आणि कोम्बिंग ऑपरेशन केले. तीन तासांच्या या मोहिमेत शहरातील ७२ ठिकाणी तपासणी करण्यात आली. पोलिसांनी २५० किलो गांजासह दोन आरोपींना अटक केली. एकूण १ कोटी ५१ लाख २० हजार रुपयांचा
.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ एक ते सातमधील पोलिस ठाण्यांचे अधिकारी-कर्मचारी आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी ही मोहीम राबवली. रेकॉर्डवरील गुन्हेगार, टोळ्या, हिस्ट्रीशीटर, फरार आरोपी आणि सामाजिक शांततेला धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्यात आले.
एनडीपीएस गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील १४७ आरोपींची तपासणी केली. त्यापैकी ६६ जण सापडले. पॉक्सो गुन्ह्यांतील १२१ आरोपींपैकी ४६ जण मिळाले. जबरी चोरी, चैन स्नॅचिंग आणि मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांतील २१३ आरोपींपैकी ४५ जण सापडले. तडीपार केलेल्या सात आरोपींचीही तपासणी झाली. कारागृहातून सुटलेल्या ७१४ आरोपींपैकी ३२४ जण मिळाले.
शहरातील ३७५ हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाउसची तपासणी करण्यात आली. १७७ मर्मस्थळे आणि संवेदनशील ठिकाणांचीही पाहणी झाली. अवैध शस्त्रांप्रकरणी तीन गुन्हे दाखल करून दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तीन शस्त्रे जप्त केली. अवैध अग्निशस्त्र प्रकरणी एक गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली.
याशिवाय ६८ ठिकाणी फिक्स पॉइंट पेट्रोलिंग आणि ४३ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. एकूण १,५१७ वाहनांची तपासणी करून मोटार वाहन कायद्यानुसार ११४ चालकांवर कारवाई केली. अवैध धंदे, दारूबंदी आणि जुगार प्रतिबंधक कायद्यानुसारही तीन कारवाया करण्यात आल्या.
गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अशा मोहिमा पुढेही सुरू राहतील, असे पोलिसांनी सांगितले.