![]()
दुष्काळाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारबरोबरच शिवसेनाही सर्वतोपरी मदत करत असून, बळीराजाने कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नये यासाठी पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. महा
.
महाड आणि पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्तांचे रखडलेले पुनर्वसन लवकरच मार्गी लावून बाधित कुटुंबांना हक्काची घरे दिली जातील, असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. महाड-पोलादपूरमधील दरडग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी तळीये तसेच पारमाची येथील बाधित कुटुंबांना लवकरात लवकर घरे उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्याचे सांगितले. याप्रसंगी बोलताना, होणारी कामे सगळेच करतात, पण न होणारी कामे मी करतो, असेही शिंदे यांनी ठामपणे नमूद केले.
मराठवाड्याच्या मदतीसाठी रायगडातून 50 ट्रक चारा रवाना
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्यातील मुक्या जनावरांसाठी रायगड जिल्ह्याने मदतीचा हात पुढे केला असून, महाड आणि पोलादपूर तालुक्यांतून संकलित केलेला चारा लातूर, धाराशिव आणि बीड या दुष्काळग्रस्त भागांत पाठविण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत चारा वाहून नेणाऱ्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या उपक्रमांतर्गत सुमारे 50 ट्रक चारा पाठविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
वसुली करणाऱ्यांना सक्त इशारा
रायगडावर छत्रपतींचे दर्शन व आशीर्वाद घेतल्यानंतर बोलताना एकनाथ शिंदे यांनी गडकोट किल्ले प्रदूषणमुक्त ठेवणे आवश्यक असून, राज्यातील 11 किल्ले युनेस्कोमध्ये नोंदविले गेल्याने छत्रपतींचे किल्ले सातासमुद्रापार पोहोचल्याचे नमूद केले. राज्यातील शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाची जबाबदारी शिवसेनेने उचलली असून, शेतकऱ्यांनी कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नये, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, महाराष्ट्राच्या तिजोरीवर बळीराजाचा, शेतकऱ्यांचा अधिकार आहे. बळीराजाने वाकडे तिकडे करू नये. बळीराजाच्या मागे बँकावाले, वसुलीवाले तगादा लावतील, तर त्यांना डांबून ठेवले जाईल, त्यांना जेलमध्ये टाकलं जाईल, असा सक्त इशाराही शिंदे यांनी दिला.
चवदार तळे सुशोभीकरणासाठी 100 कोटी
महाड शहरातील पूर आणि चवदार तळ्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देत चवदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी 100 कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. मी मुख्यमंत्री असताना भरत गोगावले यांनी विकासकामांसाठी 350 कोटी रुपये मंजूर करून घेतले होते, असे सांगत त्यांनी महाडमधील दरडीत गाडली गेलेली घरे पुन्हा बांधून देण्याचे वचन नागरिकांना दिले. याप्रसंगी, संविधान आता कधीही संकटात सापडणार नाही; जिथे कमी तिथे आम्ही. जे काम कोणी करत नाही, तेच एकनाथ शिंदे करतो, अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली.