![]()
हिंगोली शहरातील भाजीमंडई भागात एका कार्यालयावर जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांच्या पथकाने शुक्रवारी ता. 27 दुपारी छापा टाकला. यावेळी कार्यालयात 5 रजिष्टर, 25 डायऱ्या, 13 बॉन्ड, 8 कोरे धनादेश यासह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या सर्व दस्ताऐवजीं
.
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील भाजी मंडई भागात निवास साबळे याच्या बाबत अवैध सावकरी केल्या जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे, सहाय्यक निबंधक अक्षय गुठ्ठे, शिवशंकर आंधळे, अनोज वानखेडे, के. जी. घासेवाड, पोलिस कर्मचारी आकाश बोथीकर यांच्या पथकाने आज दुपारी भाजी मंडईत साबळे यांच्या कार्यालयावर छापा टाकला.
यावेळी कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी केली असता त्या ठिकाणी 5 रजिष्टर, 25 डायऱ्या, 13 बॉन्ड, विविध राष्ट्रीयकृत बँकेचे स्वाक्षरी केलेले 8 कोरे धनादेश, व्यवहाराच्या 25 चिठ्या, 16 ओळखपत्रे सापडली. या पथकाने सर्व कागदपत्रे तपासणीसाठी जप्त केली आहेत. यामध्ये बॉन्ड पेपरवर काही नांवे आढळून आली आहेत. सदर दस्ताऐवज जप्त करून उपनिबंधक कार्यालयात आणण्यात आली आहेत.
दऱम्यान, आता या दस्ता ऐवजांची तपासणी केली जात असून त्यावर नांवे असलेल्या व्यक्तींना जिल्हा उपनिबंधक कार्यालयात बोलावून त्यांचे जवाब नोंदविले जाणार आहेत. या जवाबानंतरच पुढील कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी सांगितले.