Headlines

डिलिमिटेशन विधेयकावरून विरोधकांमध्ये दोन सूर: काँग्रेसचा विरोध नाही, पण राज्यांच्या जागांचे प्रमाण बदलू नये- पृथ्वीराज चव्हाण



केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विशेष अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक मांडण्यात येणार असून आज कॅबिनेट मंत्रिमंडळाने त्याला मंजूरी देखील दिली आहे. यावर आता विरोधकांकडून संमिश्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या विधेयकाला

.

प्रसार माध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भाजपने अपेक्षेप्रमाणे 29 तारखेला विशेष अधिवेशन बोलावले आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन अद्याप स्थगित न केल्यामुळे दोन दिवसांत नवीन अधिवेशन बोलावता आले. त्यामुळे हे हिवाळी अधिवेशन नसून पावसाळी अधिवेशनाचाच पुढील टप्पा आहे. कोणालाही विश्वासात न घेता, मागच्या दाराने लपून छ्पून परिसिमन (डिलिमिटेशन) विधेयक आणले जात आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला आहे.

परिसिमन करायचे असेल तर नक्की करा. परंतु..

तसेच डिलिमिटेशन विधेयकासंदर्भात बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, विधेयकातील नेमक्या तरतुदी पाहिल्याशिवाय अंतिम भूमिका घेता येणार नाही. मात्र, कॉंग्रेसचा डिलिमिटेशनला विरोध नाही. परिसिमन करायचे असेल तर नक्की करा. परंतु राज्यांची तुलनात्मक जागांची संख्या बदलू नका. जेणेकरून कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही, अशी भूमिका चव्हाण यांनी मांडली आहे. तसेच महिला आरक्षण आणण्यासाठी डिलिमिटेशन करत आहोत, असा जो दावा केला जात आहे, ती बोगसगिरी आणि खोटारडेपणा असून त्यातून सरकार थापा मारून भारताच्या जनतेची फसवणूक करत आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला आहे.

डिलिमिटेशनचा दिला ऐतिहासिक दाखला

पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, परिसिमन ही मूळ घटनेतील तरतूद असून 1951, 1961 आणि 1971 च्या जनगणनेनंतर परिसिमन झाले होते. प्रत्येक जनगणनेनंतर राज्यांच्या लोकसभेतील जागांची तुलनात्मक संख्या बदलत राहिल्यास दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय होईल. हे ओळखून 1976 मध्ये इंदिरा गांधी यांनी 1971 च्या जनगणनेनुसार लोकसभेच्या जागांची संख्या 25 वर्षांसाठी गोठवण्याचा निर्णय घेतला. 2001 मध्ये हा कालावधी संपल्यानंतर पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आणखी 25 वर्षांसाठी जागा गोठवण्याचा निर्णय कायम ठेवला, जो आता 2026 मध्ये पूर्ण होत आहे, अशी माहिती चव्हाण यांनी दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *