केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या डिलिमिटेशन विधेयकावरून देशभरात जोरदार चर्चा सुरू असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका स्पष्ट होऊ लागली आहे. या विधेयकामुळे 50 टक्के जागा वाढणार असतील तर आपला पाठिंबा असेल आणि यावर ‘इंडि
.
शरद पवारांची रुग्णालयात भेट घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, पवार साहेबांशी माझी या विषयावर यापूर्वीही चर्चा झाली होती. तेव्हा डिलिमिटेशनचा विषयही नव्हता. पण तेव्हा साहेबांनी मला सांगितले होते की, डिलिमिटेशन हे कॉन्स्टिट्यूशनल असून ते करावे लागते. त्याला काही पर्याय नसतो. आपापले मतदारसंघ बांधायला शिका, कितीदिवस असे चालायचे. ही सगळी आमची अनौपचारिक चर्चा होती. पुढे आव्हाड म्हणाले की, मी ओपनली सांगतो, साहेब हे माझे दैवत आहेत. माझ्या दैवताची भूमिका जी, तिच माझी भूमिका आहे. त्यामुळे भूमिकेच्या बाबतीत कोणाचाच काही प्रश्न येत नाही. 8 खासदारांना घेऊन सुप्रिया ताईंनी निर्णय घेतलेला आहे, अशी माहिती आव्हाड यांनी दिली आहे.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड यांनी डिलिमिटेशनला आपला विरोध दर्शवला होता. सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत जेव्हा महिलांना 50 टक्के आरक्षण दिले जाणार असेल तर आम्ही सकारात्मक विचार करू शकतो असे म्हटले होते. त्यानंतर नताशा आव्हाड यांनी डिलिमिटेशन हे विधेयक लोकशाहीवर थेट आघात करणारे असल्याची टीका केली होती.
डिलिमिटेशन लोकशाहीवर थेट आघात- नताशा आव्हाड
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून नताशा आव्हाड यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरील चर्चेत महिला आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करणे हे चुकीचे, दिशाभूल करणारे आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टीका त्यांनी केली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले असल्याने आगामी निवडणुकांमध्ये त्याची अंमलबजावणी करण्याची संधी भाजपकडे होती, असे ट्विट त्यांनी केले आहे.
परिसिमन करायचे असेल तर नक्की करा- पृथ्वीराज चव्हाण
दरम्यान, दुसरीकडे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील कॉंग्रेसचा डिलिमिटेशनला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी प्रसार माध्यमांना बोलताना सांगितले की, विधेयकातील नेमक्या तरतुदी पाहिल्याशिवाय अंतिम भूमिका घेता येणार नाही. मात्र, कॉंग्रेसचा डिलिमिटेशनला विरोध नाही. परिसिमन करायचे असेल तर नक्की करा. परंतु राज्यांची तुलनात्मक जागांची संख्या बदलू नका. जेणेकरून कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही, अशी भूमिका चव्हाण यांनी मांडली आहे. तसेच महिला आरक्षण आणण्यासाठी डिलिमिटेशन करत आहोत, असा जो दावा केला जात आहे, ती बोगसगिरी आणि खोटारडेपणा असून त्यातून सरकार थापा मारून भारताच्या जनतेची फसवणूक करत आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला आहे.
या संदर्भातील ही देखील बातमी वाचा..
संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी शरद पवार गटाचा व्हीप:अजेंडा माहित नाही, बिलही पाहिले नाही- सुळे, हे विधेयक लोकशाहीवर थेट आघात- नताशा आव्हाड

केंद्र सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनाच्या आणि संभाव्य डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी ‘व्हीप’ जारी केला आहे. दुसरीकडे, खासदार सुप्रिया सुळे यांनी अद्याप डिलिमिटेशन विधेयक पाहिले नसल्याचे सांगत भूमिका स्पष्ट करणे टाळले आहे, तर नताशा आव्हाड यांनी महिला आरक्षणाचा मुद्दा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाशी जोडणे दिशाभूल करणारे असल्याची टीका भाजपवर केली आहे. वाचा सविस्तर