Headlines

मेटाच्या कारवाईविरोधात व्यंगचित्रकारांचे आंदोलन: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सहभाग; पुण्यातील गुडलक चौकात कार्टूनिस्ट्स कंबाइनच्या इन्स्टाग्राम पेजवरील कारवाईचा निषेध



कार्टूनिस्ट्स कंबाइनचे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव यांनी व्यंगचित्रकारांची मुस्कटदाबी सहन केली जाणार नाही, असा इशारा दिला. सोशल मीडिया खात्यांवरील कारवाईच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि व्यंगचित्रकारांनी शनिवारी, 28 न

.

व्यंगचित्रकारांची सोशल मीडिया खाती आणि कार्टूनिस्ट्स कंबाइन संस्थेचे इन्स्टाग्राम पेज बंद करण्यात आल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. मेटाच्या या कारवाईविरोधात आंदोलन करण्यात आले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्रकारांसाठी संघटनात्मक व्यासपीठ म्हणून कार्टूनिस्ट्स कंबाइनची स्थापना केली होती. संस्थेचे इन्स्टाग्राम पेज आणि काही व्यंगचित्रकारांची खाती बंद झाल्याने व्यंगचित्रकारांनी नाराजी व्यक्त केली.

गौरव सर्जेराव म्हणाले, “भारतीय संविधानाने नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. विरोधकांना आणि टीकाकारांना व्यक्त होऊ दिले जाऊ नये, अशा प्रकारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कारवाई होत असल्याचा आमचा आक्षेप आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे प्रयत्न सहन केले जाणार नाहीत. संविधानाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे.”

आंदोलनात कार्टूनिस्ट्स कंबाइनचे अध्यक्ष गौरव सर्जेराव यांच्यासह अमित पापळ, धनराज गरड, उदय मोहिते, रोहित कबाडे, नीरज सबनीस, ओंकार बागवे, विशाल कुयटे, प्रभाकर दिघेवार, मुकीम तांबोळी, निखिल विल्हेकर, मंदार पर्डीकर आणि जयेश दळवी सहभागी झाले.

शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख वसंत मोरे, सहसंपर्कप्रमुख संजय मोरे, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनीही आंदोलनात सहभाग घेतला. सोशल मीडिया खात्यांवरील कारवाईत पारदर्शकता ठेवावी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार कायम ठेवावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *