भाजपच्या लोकांनी राष्ट्रहिताच्या गोष्टी करू नयेत; त्यांचे हित केवळ गौतम अदानी यांचा फायदा करणे आणि त्यांना सर्व काही ताब्यात देणे, हेच त्यांचे राष्ट्रहित आहे, अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याने संविध
.
संजय राऊत म्हणाले की, शरद पवार यांनी देशहितासाठी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला, असे म्हटले जाते. मग माझा देवेंद्र फडणवीस यांच्यासह मोदी-शहांना प्रश्न आहे की, कोणत्या देशहितासाठी तुम्ही शरद पवार यांचा पक्ष फोडला? असे कोणते देशहित होते की, शरद पवारांचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला? याचे उत्तर मोदी-शहा आणि फडणवीस यांनी दिले पाहिजे. अमित शहा हे महाराष्ट्राचे सर्वात मोठे शत्रू आहेत; त्यांना महाराष्ट्र तोडायचा आहे, त्यांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे.

लोकशाहीला गुलाम करण्यासाठी डिलिमिटेशन विधेयक
संजय राऊत म्हणाले की, अमित शहा यांनी शरद पवारांना देशातील भ्रष्टाचाराचे शिरोमणी असे संबोधले होते. शहांनी महाराष्ट्रात येऊन हे म्हटले होते. यामध्ये कोणते देशहित आहे? त्याच पवारांना तुम्ही देशहितासाठी जवळ करत आहात का? देशातील लोकशाहीला गुलाम करण्यासाठी हे डिलिमिटेशन विधेयक आणले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
सुळेंनी अचानक भूमिका का बदलली?
संजय राऊत म्हणाले की, शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे कालपर्यंत डिलिमिटेशन विधेयकाला साथ देत नव्हते. रामलीला मैदानावर ज्यावेळी रॅली झाली, त्यावेळी आमच्या उघड्या जीपमध्ये सुप्रिया सुळे होत्या. त्यांनी संविधानविरोधी धोरणांविरोधातील जनसागराला अभिवादन केले; पण आता अचानक काय झाले, असा प्रश्न जनतेला पडला आहे, असे राऊत यांनी नमूद केले.
शेवटच्या मिनिटापर्यंत ‘देश बचाव’ची लढाई सुरू राहील
संजय राऊत म्हणाले की, इंडिया आघाडीने आणि महाविकास आघाडीने अजून लढाई सोडलेली नाही. मल्लिकार्जुन खरगे आज मुंबईत येत असून, ते शरद पवारांची भेट घेणार आहेत; बहुतेक त्यांच्यासोबत राहुल गांधी आणि सोनिया गांधी असतील. त्यानंतर ते चेन्नईला जाऊन एम. के. स्टॅलिन यांनाही भेटणार आहेत. शेवटच्या मिनिटापर्यंत ‘देश बचाव’ची लढाई सुरू राहील.
ठाकरे दबाव-आमिषांना बळी पडले नाहीत
संजय राऊत म्हणाले की, डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यावरही दबावाचा प्रयत्न झाला. आमचे सहा खासदार त्यांनी फोडले; उरलेल्या तीन खासदारांचाही त्यांना मोह आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी दबाव आणि आमिषे झुगारत लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी सज्ज राहिले आहेत. ते डगमगले नाहीत, याची नोंद इतिहासात राहील.
हे ही वृत्त वाचा
महिला आरक्षणाच्या नावाखाली संविधान संपवण्याचा भाजप-संघाचा डाव:डिलिमिटेशनचा निर्णय हा शरद पवारांचा प्रश्न- नाना पटोले

महिला आरक्षणाचे नाव पुढे करून देशाचे संविधान संपवण्याचा प्रयत्न भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सुरू असून, त्यांचा हा मनसुबा देशातील जनतेने ओळखला आहे, असा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. तसेच, मतदारसंघ पुनर्रचनेबाबत (डिलिमिटेशन) काय निर्णय घ्यायचा हा शरद पवार यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे सांगत, राहुल गांधी यांनी या संदर्भात मांडलेल्या सकारात्मक भूमिकेचे देशभरातील लोकांनी स्वागत केले असल्याचे पटोले यांनी नमूद केले. वाचा सविस्तर