Headlines

पिस्तुले विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक: पुण्यातील सोमवार पेठेतून तीन पिस्तुले आणि आठ काडतुसे जप्त



पुण्यातील सोमवार पेठेत देशी बनावटीची पिस्तुले विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून तीन पिस्तुले आणि आठ काडतुसे जप्त करण्यात आली.

.

अटक केलेल्यांची नावे शाहरुख सैफान शेख (वय २७, रा. इशरतबाग, एनआयबीएम रस्ता, कोंढवा) आणि प्रभूलक्ष्मण गुगल जेड्डी (वय ३५, रा. सूर्या हॉस्पिटलजवळ, १३१४, कसबा पेठ) अशी आहेत.

शेखविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई झाली होती. या प्रकरणात त्याला जामीन मिळाला होता.

शेख आणि जेड्डी सोमवार पेठेत पिस्तुले विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले. झडतीत त्यांच्याकडून तीन देशी बनावटीची पिस्तुले आणि आठ काडतुसे मिळाली.

अतिरिक्त पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, उपायुक्त गौहर हसन आणि सहायक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, उपनिरीक्षक योगेश कोतकर, आशा भिंगारे, संजय राजे, साळुंके, अमोल सरडे, नीलेश जाधव, अतुल क्षीरसागर, तुषार साळुंखे, भिलारे, अविनाश रेडके आणि संदीप शिर्के यांनी कारवाईत भाग घेतला.

मोटारीची काच फोडून लॅपटॉप चोरी

मोटारीची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप, रोकड असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना कात्रज भागातील आंबेगाव परिसरात घडली. याबाबत एका तरुणाने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण आंबेगाव परिसरातील एका सोसायटीत राहायला आहेत. त्यांनी कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्ग परिसरात सेवा रस्त्यावर मोटार लावली होती. चोरट्यांनी मोटारीची काच फोडली. मोटारीत ठेवलेला ६० हजारांचा लॅपटॉप, पाकिटातील पाच हजारांची रोकड असा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली. पोलीस हवालदार हनुमंत मासाळ तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *