Headlines

सुनील तटकरेंना केंद्रात मंत्रिपद मिळेल: अनिकेत तटकरेंचे सूचक वक्तव्य; म्हणाले- माझ्यासारख्या दगडाला शेंदूर लावण्याचे काम त्यांनी केले



भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस समितीच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा निवड झाल्यानिमित्त सुनील तटकरे यांचा नागरी सत्कार सोहळा रोहा शहरात संपन्न झाला. यावेळी बोलताना आमदार अनिकेत तटकरे म्हणाले की, माझ्यासारख्या दगडाला शेंदूर लावण्याचे काम सुन

.

अनिकेत तटकरे म्हणाले की, आम्ही काम करताना चुकलो तर त्याचा दोष साहेबांना देऊ नका. कोणाची तिरकी नजर पडत असेल तर त्याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. येथे गटातटाचे राजकारण नसून येथे तटकरे साहेबांचे राजकारण चालते. आम्ही उठण्याच्या आधी सुनील तटकरे सकाळी लवकर उठून गीता बागेला फेर फटका मारतात. साहेबांच्या कामामुळे युवावर्ग आकर्षित होत आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्यात सुनील तटकरे यांचीच क्रेझ आहे. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत हार मानणार नाही आणि अडचणीच्या संकट काळात आलेली भिंत तोडत राहू, असे अनिकेत तटकरे म्हणाले.

यावेळी बोलताना सुनील तटकरे म्हणाले, माझी तब्येत उत्तम मातर डोक्यात आनंदाश्रू आहेत. मला मागील 45 वर्षांत पाठीमागे वळून बघण्याची वेळ आली नाही. रोहेकरांच्या अभिमानाला आणि स्वाभिमानाला ठेच लागते तेव्हा रोहेकर शांत बसत नाहीत, असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. तसेच रोहेकरांनी केलेल्या संस्कारांमुळेच मी राजकारणात उभा आहे, असेही तटकरे म्हणाले.

पुढे बोलताना सुनील तटकरे म्हणाले, सुनील आता एकता नाही तर संपूर्ण रोहा तालुक्याची ताकद माझ्या पाठीमागे उभी आहे. रोहेकरांची मान माझ्यामुळे कधीच खाली जाणार नाही. मी देशभरात आणि राज्यात योग्य पद्धतीने काम करतो. माझ्यावर जेव्हा टीका होते तेव्हा रोह्यातील स्वाभिमानी जागा होतो. कोणावर टीका करणे ही माझी संस्कृती नाही.

मी कागद घेऊन कधीच भाषण केलेलं नाही. पत्रकांराजवळ बोलताना कधी आयुष्यात दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली नाही. राजकारणातील उत्तरे पुस्तकात वाचून मिळत नाही तरी जनतेतून मिळतात. उद्याच्या देशाच्या सर्वोच्च सभागृहात ऐतिहासिक विधेयक मांडण्यात येणार आहे. त्याला समर्थन मी करणार आहे असे तटकरे म्हणाले. मला महायुतीतील सर्वच पक्षांनी मदत केली आहे. त्यामुळे मी कोणावर काही बोलणार नाही. माझ्या मनाला कधीच अहंकार शिवला नाही. मी कुटुंबातील कोणाच्याच वाढदिवसाला उपस्थित नसतो. मात्र माझ्या वाढदिवसला सगळेच उपस्थित असतात, असेही तटकरे यांनी यावेळी बोलून दाखवले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *