- Marathi News
- National
- The Bodies Of The Children Have Been Lying For 24 Days; The Grandfather Said I Don’t Want Money; The Killers Are Wanted, The Death Of The Brother And Sister In The Blast Increased The Grief Of Manipur
डी. कुमार | ट्रोंगलाओबी गाव (मणिपूर)33 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

‘जोपर्यंत मुलांच्या मारेकऱ्यांना सरकार अटक करून शिक्षा देत नाही, तोवर आम्ही आमच्या मुलांवर अंत्यसंस्कार करणार नाही. पोलिसांनी कुणाला अटक केली, हे आम्हाला माहीत नाही. सरकार १०-१० लाख रुपये घेऊन मुलांचे अंत्यसंस्कार करण्यास सांगत आहे, पण आम्हाला पैसा नको आहेत. आम्हाला मारेकरी हवेत. त्या निर्दयी लोकांनी अशा एका चिमुकलीला मारून टाकले, जिने जन्मानंतर अन्नाचा एक कणही चाखला नव्हता.’
हे शब्द, त्यांचा स्वर आणि त्यामागच्या भावना जो कुणी ऐकत होता, त्याचे डोळे पाणावत होते. हे शब्द ७१ वर्षांच्या बाबुटन ओइनाम यांचे आहेत, ज्यांच्या नातवाचा आणि नातीचा मृत्यू ७ एप्रिल रोजी मणिपूरच्या ट्रोंगलाओबी गावात एका बॉम्बस्फोटात झाला होता. या हल्ल्याचा आरोप संशयास्पद कुकी कट्टरपंथीयावर आहे. दोन्ही मृतदेह आज २४ दिवसांनंतरही ४७ किमी लांब इंफालच्या रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या शवागारात ठेवले आहेत. बाबुटन म्हणतात की जोपर्यंत गुन्हेगाराला अटक होत नाहीत, तोपर्यंत आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही.
या निष्पाप मृत्यूंनी मणिपूर हिंसेच्या वेदना अनेक पटींनी वाढवल्या आहेत. भास्करची टीम गुरुवारी मुलांच्या घरी ट्रोंगलाओबी गावात पोहोचली. खुल्या शेताजवळ बनलेल्या घरात शिरताच भिंत व आसपास व पत्र्यांवरील बाँबच्या छऱ्यांनी झालेली छिद्रे थरकाप उडवतात. ज्या खिडकीवर बाँब फोडण्यात आला होता, तिची दुरुस्ती केली आहे. पण, बाबुटन यांचे संपूर्ण कुटुंब धक्क्यात आहे.
ते म्हणतात- माहीत नाही, मुलांच्या आत्म्याला कधी शांती मिळेल. मणिपूरच्या भाजप सरकारने या घटनेचा तपास एनआयएकडे सोपवला आहे. सुरुवातीला काही संशयास्पद कुकी कट्टरपंथीयांना अटक केल्याच्या बातम्या आल्या, पण त्याबाबत स्पष्टता नाही.
२४ दिवसांपासून निदर्शने, महिला म्हणाल्या- सरकार खोटे
एनएच २०२ वर मोइरांगमध्ये मैतेई महिला २४ दिवसांपासून निदर्शने करत आहेत. येथे बसलेल्या प्रेमिता म्हणतात, आम्ही २४ तास धरणे आंदोलनावर आहोत. सरकारचे कुणी आले नाही. सरकार खोटे बोलत आहे. त्यांनी अटक केलेली नाही. दुसरीकडे, कुकी संघटनेने अटकेबाबत अनभिज्ञता व्यक्त केली.
ज्यांना अटक केली, ते तर आधीच तुरुंगात होते…
ज्या तीन लोकांना पकडल्याचा दावा केला जात आहे, त्यांच्याबद्दल लोक म्हणत आहेत की हे कट्टरपंथी आधीच तुरुंगात बंद आहेत, असे बाबुटन यांनी सांगितले. मग पोलिसांनी त्यांनाच पुन्हा का अटक केली? याच खोट्या दाव्यांमुळे मुलांचे मृतदेह घरी आणले नाहीत.