![]()
आरोग्य विभागातील ४ जिल्ह्यांमध्ये वर्षभरात अर्थात ३६५ दिवसांत १३,३३७ गर्भपात झाले आहेत. म्हणजेच दिवसाकाठी ३६ गर्भपात झालेत. संभाजीनगरसह जालना, हिंगोली आणि परभणीचा या विभागात समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १०,५४७ गर्भपात झाले आहेत. ४ जिल्ह्यांच्या तुलनेत ही टक्केवारी ७९.०८ आहे. म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यात २८.८९ गर्भपात झाले आहेत. गर्भपाताच्या तुलनेत विभागात एकूण १,६५,७४० प्रसूती झाल्या आहेत. त्यापैकी ५७,७५१ संभाजीनगरच्या आहेत. म्हणजेच दिवसाला २६४ प्रसुती तर २८ गर्भपाताची नोंद आरोग्य विभागात आहे. मराठवाडा विभागात एकूण ८ जिल्हे आहेत. पैकी लातूर, बीड, उस्मानाबादसह ४ जिल्हे नांदेड विभागात येतात, तर उर्वरित ४ जिल्हे छत्रपती संभाजीनगरमध्ये येतात. या चारही जिल्ह्यांच्या तुलनेत छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसूती आणि गर्भपाताचे प्रमाण अधिक आहे. २६४ प्रसूतीमागे २८ गर्भपात होतात, म्हणजेच प्रसुतीला येणाऱ्या प्रत्येकी ९ महिलांचा गर्भपात झाला आहे, तर दिवसाकाठी ३० गर्भपात झाल्याचे वास्तव समोर आले आहे. एकूण गर्भपातापैकी ३,५९६ नैसर्गिक गर्भपात आहेत. जालन्यात सर्वात कमी ७८१ गर्भपात झाले आहेत. जिल्हा उद्दिष्ट प्रसूती दिवसाला टक्के संभाजीनगर ७२२०३ ५७७५१ २६४.५१ ६९
जालना ३७०५१ २१३८७ १३५.२२ ४८
परभणी ३४२०७ २२४६१ १२४.८४ ५८
हिंगोली २२२७९ १४२५७ ८१.३१ ५४
एकूण १६५७४० ११५८५६ ६०४.८९ ६० मागील काही महिन्यांत शहरामध्ये गर्भपाताचे अनेक रॅकेट उघडकीस आले आहेत. या आकडेवारीचा अभ्यास करता नैसर्गिक गर्भपात तपासणी अंती केलेलेही असू शकतात. समाजाच्या मानसिकतेत बदल घडवून आणणे, त्यासाठी कसोसीने प्रयत्न करणे. अवैध वैद्यकीय प्रॅक्टीस करणाऱ्यांना आळा घालणे अशा विविध स्तरांवर काम करुन हे रोखणे गरजेचे आहे. -रेणुका कड, सामाजिक अभ्यासक संभाजीनगरात गर्भपात वाढीची ५ प्रमुख कारणे गर्भनिरोधक गोळ्यांऐवजी वैद्यकीय गर्भपात सोपा झाला.
मेडिकल दुकानांवर नियंत्रण नाही. लगेचच औषधी उपलब्ध होते.
स्वत:च्या स्वास्थ्याबद्दल जागरुकता नाही.
कायदेशीर गर्भपात करुन देणारी सेवा वाढली आहे.
मुलाच्या हव्यासापोटी मिळतेय अवैध गर्भपात करणाऱ्यांना अशा प्रकाराची संधी एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ दरम्यान झालेले गर्भपात गर्भपात संभाजीनगर हिंगोली जालना परभणी
नैसर्गिक ३५९६ ३२० १९६ ५३६
सिझेरियन(१२ आठवडे पूर्व) २४७३ ५५८ ३५४ २२३
सिझेरियन १२ आठवड्यांनंतर ७९८ ९० ११७ ५७
वैद्यकीय पद्धतीचे गर्भपात ३६८० १२१ ११४ १०४
एकूण १०५४७ १०८९ ७८१ ९२०
दिवसाला ३०.६५ ३.१६ २.२ २.६७ गर्भपात वाढणे हे कधीच योग्य नाही गर्भपातांमध्ये वाढ होणे हे चांगले लक्षण नाही. ४० वर्षांपूर्वी ३५ प्रसूतीरोगतज्ज्ञ होते. आज त्यांची संख्या ३५० आहे. अधिकृत गर्भपात करण्याची सोय सहज उपलब्ध होते. सुरक्षित गर्भपाताची सोय वाढली तरीही गर्भपात करणे हे योग्य नाही. याऐवजी गर्भनिरोधक वापरणे अधिक चांगला पर्याय आहे. फार्मसी दुकानांमध्ये विनानियंत्रण गर्भपाताच्या गोळ्या सहज उपलब्ध आहेत, हे देखील गर्भपातांचे एक कारण आहे. याचे गंभीर परिणाम स्त्रियांच्या आरोग्यावर होतात. – डॉ. स्वाती शिराडकर, अधिष्ठाता मुलगा १९ वर्षांचा, आईचे दरवर्षी गर्भपात शिक्षणाचा अभाव, गैरसमजुती यामुळे महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. प्रसूती सोपी पण गर्भपात अधिक कठीण आहे. यामध्ये जीवाचा धोका अधिक आहे. पंचशीलनगरातील एका महिलेला १९ वर्षांचा मुलगा आहे, पण तिचा दरवर्षी गर्भपात होतो. अनेकदा समुपदेशन करुनही निरोधाचा पर्याय ती स्वीकारत नाही. वारंवार गर्भपाताने गुणवत्तापूर्ण आयुष्य कमी होते. – शीला देवजी साठे, अंगणवाडी सेविका
Source link
दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:छत्रपती संभाजीनगरात दर दिवसाला 10 नैसर्गिक तर वैद्यकीय पद्धतीने 18 गर्भपात, जिल्ह्यात 10,547 गर्भपातांची नोंद