![]()
जायकवाडी धरणातून जालना, छत्रपती संभाजीनगरला एक महिना पुरेल इतक्या पाण्याचे दररोज बाष्पीभवन होत आहे. सध्या धरणातील पाणीसाठा ४५.६० टक्क्यांवर असून याच कालावधीत मागील वर्षी तो ३७.९७ टक्के होता. गेल्या वर्षी बाष्पीभवनाचा दर सुमारे २ दलघमीपर्यंत पोहोचला होता. तर यंदा तो १.९१७ दलघमी इतका नोंदवला गेला आहे. मे महिन्यातील बाष्पीभवन गेल्या वर्षी २ दलघमीपर्यंत गेले होते. यंदा मात्र ते ०.९०१ दलघमीवर मर्यादित राहिले आहे. मार्च-एप्रिलमध्ये सरासरी प्रतिदिन सुमारे १.८ दलघमी बाष्पीभवन होत असते. मराठवाड्यातील मोठ्या धरणांमध्येही दररोज दीड दलघमीपेक्षा अधिक पाणी केवळ उन्हामुळे बाष्प होते, असे अभियंता मंगेश शेलार यांनी सांगितले. उन्हाळी हंगामासाठी जायकवाडीच्या डाव्या व उजव्या कालव्यांतून सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे. या विसर्गामुळेही धरणाच्या साठ्यात वेगाने घट होत असून येणाऱ्या काळात पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यात येत असल्याचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी सांगितले. एक महिना पुरेल एवढ्या पाण्याचे दररोज बाष्प जायकवाडी धरणाचे दररोज १.९०७ दलघमीहून अधिक बाष्पीभवन दररोज होत आहे. संभाजीनगर, जालना शहराला पिण्यासाठी महिनाभर पाणी पुरेल एवढ्या पाण्याचे दररोज बाष्पीभवन होत आहे. उन्हाळा मराठवाड्यासाठी कठीण ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे आदेश आमदार विलास भुमरे यांनी दिले आहेत.
Source link
जायकवाडी धरणातून 1.917 दलघमीचे दररोज बाष्पीभवन:सध्या धरणातील पाणीसाठा 45.60% उपलब्ध