![]()
मनपा निवडणुकीच्या काळात मनसे विद्यार्थी शहर प्रमुख सरवदे याच्या खून प्रकरणात चार महिन्यांपासून अटकेत असलेल्या नगरसेवक शालन शिंदेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. मात्र तिची बहीण शारदा शिंदे हिचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. शालन शिंदे यांचे वकील संतोष न्हावकर आता जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार आहे. रविवार पेठ, जोशी गल्लीत निवडणुकीच्या वादातून बाळासाहेब सरवदे यांचा खून करण्यात आला. या प्रकरणातील अटकेत असलेली आरोपी शारदा तानाजी शिंदे हिचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजवैद्य पी.पी. यांनी मंजूर केला आहे. दरम्यान, याच प्रकरणातील संशयित आरोपी भाजपच्या नगरसेविका शालन शिंदे हिचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. सरकारी वकील: जामीन दिल्यास साक्षीदारांवर दबाव सरकारी वकील प्रदीपसिंग रजपूत यांनी शालन शिंदे हिच्या जामीन अर्जास विरोध केला. गुन्ह्याचे स्वरूप गंभीर आहे. राजकीय वैमनस्यातून आरोपींनी सरवदे यांचा खून केला. त्याचे १० साक्षीदार आहेत. वैद्यकीय पुरावा आहे. आरोपीस जामीन दिल्यास ते सरकारी साक्षीदारांवर दबाव आणू शकतात. सरकार पक्ष खटला चालवण्यास तयार आहे,त्यामुळे आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर करण्याची विनंती केली.’ हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने शालन शिंदे हिचा अर्ज फेटाळला. फिर्यादी बाजीराव सरवदे यांच्या तक्रारीनुसार, निवडणुकीत उभे राहू नये आणि अपक्ष अर्ज मागे घ्यावा, यासाठी आरोपींनी धमकी दिली होती. २ जानेवारी रोजी जोशी गल्लीतील हनुमान मंदिराजवळ हा वाद झाला. आरोपींनी बाळासाहेब सरवदे यांच्या डोळ्यात चटणी टाकून, तलवार व कोयत्याने छातीवर वार करून त्यांची हत्या केली होती. या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सर्व जण अटकेत आहेत. मनसे विद्यार्थी सेनाप्रमुख बाळासाहेब सरवदे खून प्रकरण आरोपी शारदा शिंदे तर्फे अॅड. संतोष न्हावकर यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, ‘आरोपीने मृताच्या डोळ्यात चटणी टाकल्याचा आरोप आहे. पण फॉरेन्सिक रिपोर्ट आणि शवविच्छेदन अहवालात चटणीचे अंश आढळलेले नाहीत. तसेच इतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी शारदा शिंदेवर कोणतेही ठोस आरोप केलेले नाहीत.’ न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून शारदा शिंदे हिला जामीन मंजूर केला. त्यामुळे चार महिन्यांनी त्या बाहेर पडतील.
Source link
भाजप नगरसेविका शालन शिंदेला न्यायालयाने जामीन पुन्हा नाकारला:शालन हिची बहीण शारदा शिंदे हिला चार महिन्यांनी जामीन झाला मंजूर