![]()
कस्तुरी या सेवाभावी संस्थेने कामगारांप्रती आपली संवेदना व्यक्त करण्यासाठी “आत्मजागर’ या कार्यक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमांतर्गत समाजातील २० निराधार व गरजू कामगार महिलांना स्वयंसिद्ध करण्यासाठी शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. यात आत्महत्या, आकस्मिक आजार व इतर कारणांमुळे मृत्यू पावलेल्या कामगारांच्या पत्नी, परित्यक्ता व काही गरजू महिला कामगारांचा समावेश होता. जागतिक कामगार दिन हा जगभरातील सर्व कामगारांच्या कर्तृत्वाचा उत्सव त्यांच्या श्रमाची प्रतिष्ठा आणि सन्मान करण्याचा हा दिवस असला तरी कामगारांच्या उत्थानासाठी व कल्याणासाठी समाजाने जाणीव ठेवून आपण काय करू शकतो, याचे चिंतन करण्याचा हा दिवस आहे, असे प्रतिपादन डॉ. हेडगेवार रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे अध्यक्ष नरेंद्र पाठक यांनी केले. याप्रसंगी गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजश्री कौलखेडे, माजी आमदार वसंतराव खोटरे, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष नीकेश गुप्ता, ज्योती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब जानोळकर व कस्तुरीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. किशोर बुटोले उपस्थित होते. अपर्णा काळे यांनी निवेदन केले. सूत्रसंचालन संजय गायकवाड यांनी तर आभार कोषाध्यक्ष चेतना आनंदानी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संजय ठाकरे, संजय गायकवाड, अनिल पालवे, राजेश्वर पेठकर, घनश्याम चांडक, अमर शर्मा, संजय बुटोले, अनिता इधोळ, प्रा. रीता घोरपडे, संगीता जोध, चेतना आनंदानी, अपर्णा काळे आदींनी परिश्रम घेतले. अपघातग्रस्ताला मदत गतवर्षी अपघातझालेले प्रतीक विनोद काळे यांना कृत्रिम पायरोपणसाठी कस्तुरीच्या वतीने प्रा. अनिल मुळे व घनश्याम चांडक यांच्या हस्ते २५ हजारांचा धनादेश देण्यात आला. कस्तुरीच्या सदस्या अनिता ईधोळ यांनी निवेदन केले. अध्यक्ष प्रा. किशोर बुटोले यांनी कस्तुरीच्या सेवाविषयक कार्याची भूमिका मांडली. प्रा. नाना भडके यांनी “हीच आमुची प्रार्थना अन् हेच आमुचे मागणे’ ही प्रार्थना गायिली. याप्रसंगी मनीषा तायडे, प्रतीक्षा अलकरी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
Source link
कस्तुरीचा "आत्मजागर'' सोहळा:कामगार दिन श्रमाची प्रतिष्ठा, सन्मान करण्याचा दिवस- पाठक, निराधार महिलांना शिलाईमशिनचे वितरण