![]()
गंगापूर तालुक्यात शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अरविंद कापसे यांची पंचायत समिती गंगापूर येथे गटशिक्षणाधिकारी पदावर पदोन्नती झाल्याबद्दल शिक्षक व शिक्षकेत्तर सेनेच्या वतीने सत्कार पार पडला. कापसे हे मागील ५ वर्षांपासून गंगापूर तालुक्यात कार्यरत असून, गेल्या एक वर्षापासून त्यांनी गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभारी कार्यभार यशस्वीपणे सांभाळला होता. महाराष्ट्र शासनातर्फे तांत्रिक सेवेतील ५१ विस्तार अधिकाऱ्यांना उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावर पदोन्नती देण्यात आली असून, त्यामध्ये कापसे यांना गंगापूर तालुक्यातच पदोन्नती मिळाली आहे. या सत्कार कार्यक्रमास विस्तार अधिकारी अनिल सकदेव, शालेय पोषण आहार अधीक्षक संगीता हरकारे, शिक्षक सेनेचे मराठवाडा उपाध्यक्ष अनिल काळे, जिल्हा सरचिटणीस भगवान हिवाळे, तालुकाध्यक्ष राजेंद्र बोल्डे, विलास वाघ, हरिश्चंद्र खोसे, अभिषेक शहाणे, आबाजी सोनवणे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख उद्धव बोचरे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक साबळे, तालुका संपर्कप्रमुख कैलास गायके, तालुका सरचिटणीस सचिन साळुंके, तालुका कोषाध्यक्ष निलेश कहाटे, तालुका प्रसिद्धीप्रमुख जावेद पटेल, केंद्रप्रमुख केशव देसले, ईश्वर पवार, कडू जाधव, दिनेश देशपांडे, अनिल वाहुरवाघ, भगवान जगताप. तसेच कनिष्ठ सहाय्यक करण मोहिते, विशेष शिक्षक रामकिशन पांचाळ, सुमिती काळगे, गणेश गवांदे, महेंद्र भावसार यांच्यासह शिक्षक सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Source link
गंगापूर येथे शिक्षक सेनेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी कापसेंचा सत्कार