Headlines

बनावट नोटांचा वाद; पडेगावच्या एकाचे अपहरण; येवल्यात भक्त निवासात डांबले:15 लाखांच्या बदल्यात 30 लाखांच्या बनावट नोटांचे दाखवले आमिष




पडेगाव येथून एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला येवला येथे डांबून ठेवल्याच्या प्रकरणात बनावट नोटांच्या रॅकेटचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणी २ आरोपींना अटक करत पीडिताची सुटका केली. या घटनेमुळे शहरात बनावट नोटांचे व्यवहार करणारे संघटित जाळे सक्रिय असल्याचे उघड झाले असून, यातील मुख्य मध्यस्थ फरार झाला आहे. पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जगन्नाथ मेनकुदळे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिस आता फरार आरोपींचा शोध घेत आहेत. पडेगावमधील कासंबरी दर्गा भागातील अजीज याकूब कासकर याचे ५ मे रोजी कारमधून आलेल्या टोळीने अपहरण केले. आरोपी जनार्दन साहेबराव उगले (३८, रा. येवला) आणि विलास दादा अव्हाड (५५, रा. येवला) यांनी अजीजला गाडीत डांबून येवला येथे नेले. तेथील एका भक्त निवासातील खोलीत त्याला डांबून अमानूष मारहाण केली. शिक्षकाचाच अपहरण पॅटर्न मुख्य आरोपी जनार्दन उगले हा येवल्यात शिक्षक म्हणून नोकरीला आहे. त्याने आईच्या नावावर येवला बसस्थानकाच्या पार्किंगचा ठेका घेतला असून, तेथे आरोपी विलास आव्हाड हा वसुलीचे काम करतो. शिक्षकानेच पैशांच्या हव्यासापोटी थेट अपहरणासारखे पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. मध्यस्थ असलेल्या ‘राजू’चे आहे गुन्हेगारी कनेक्शन या व्यवहारात राजू नावाचा व्यक्ती मुख्य सूत्रधार आहे. त्यानेच बाहेरील आरोपींना तरुणांचे अपहरण करण्यास मदत केली. अजीजच्या पत्नीने खंडणीचे पैसे उभे केल्याची माहिती मिळताच तो पैसे घेण्यासाठी शहरात आला होता, मात्र पोलिसांची कुणकुण लागताच तो पसार झाला. ३० लाख न मिळाल्याने उगले याचा संताप आरोपी जनार्दन उगले याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मध्यस्थी राजू याने १५ लाख रुपयांच्या बदल्यात ३० लाखांच्या बनावट नोटा घेण्याचा व्यवहार केला होता. मात्र, १५ लाख रुपये देऊनही नोटा न मिळाल्याने उगले संतापला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *