Headlines

साई रिसॉर्ट प्रकरणात पुराव्याअभावी परबांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता:जमिनीवरील बांधकाम स्वतंत्र घटक असून कायदेही भिन्न असल्याचा युक्तिवाद



रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली (मुरुड) येथील बहुचर्चित ‘साई रिसॉर्ट’ प्रकरणात उबाठा नेते अनिल परब यांना खेड न्यायालयाने दिलासा दिला आहे. ६ मे रोजी खेड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने पुराव्यांच्या अभावी परब यांच्यासह सर्व संशयित आरोपींची निर्द

.

तांत्रिक युक्तिवाद ठरला निर्णायक

बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. सुधीर बुटाला यांनी न्यायालयात मांडले की, “जमीन आणि त्यावरील बांधकाम हे स्वतंत्र घटक असून त्यासाठीचे कायदेही भिन्न आहेत.’ न्यायालयाने हा तांत्रिक युक्तिवाद स्वीकारला. या प्रकरणात भारतीय दंड विधानातील कलम ४२० (फसवणूक), १२०-ब (गुन्हेगारी कट) आणि सीआरझेड नियमांचे उल्लंघन झाल्याचे आरोप होते.

मात्र, हे गुन्हे सिद्ध होतील असा एकही ठोस पुरावा न्यायालयासमोर आला नाही. या निकालामुळे परब यांच्यासह तत्कालीन महसूल अधिकारी आणि मुरुडच्या सरपंचांनाही मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाचा तपास ईडीने केला होता आणि राजकीय वर्तुळात यावर मोठी टीका झाली होती.

मात्र, न्यायालयाच्या या निकालामुळे आता कायदेशीर लढाईत परब यांचे पारडे जड झाले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल महाविकास आघाडीसाठी अनुकूल ठरू शकतो, असेही सांगण्यात येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *