Headlines

लग्नसराईत लालपरी हाऊसफुल्ल; पाचोरा बससाठी चार तासांची प्रतीक्षा:सिल्लोड-धुळे, अमळनेर ,कन्नड-पाचोरा, जळगाव बससाठी साकडे‎




लग्नसराईची लगबग सुरू असून, रोजच्या शुभमुहूर्तांमुळे एसटी बसमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेली लालपरी घाटनांद्रा बसस्थानकावर हाऊसफुल्ल धावत आहे. सिल्लोड–घाटनांद्रा ते सिल्लोड–पाचोरा मार्गावरील बसेस रोज प्रवाशांन भरून निघत आहेत. दरम्यान, पाचोरा बससाठी चार तासांची वाट पहावी लागत असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर सकाळी एकमेव सिल्लोड–पाचोरा बस सुरू आहे. दररोज ८० ते ९० प्रवासी प्रवास करत आहेत. बसमध्ये उभे राहायलाही जागा राहत नाही. अनेक प्रवाशांना खालीच थांबावे लागते. सिल्लोड येथून सकाळी साडेसात वाजता सुटणारी पाचोरा बस ही या मार्गावरील मुख्य सुविधा आहे. ही बस गेल्यानंतर पुढील बससाठी चार तास प्रतीक्षा करावी लागते. प्रवाशांची मोठी गैरसोय होते. एसटी महामंडळाला प्रवाशांकडून निवेदन सिल्लोड–पाचोरा, सिल्लोड–धुळे, सिल्लोड–अमळनेर या लांब पल्ल्याच्या बसेस तातडीने सुरू कराव्यात. सोयगाव–छत्रपती संभाजीनगर, कन्नड–पाचोरा, कन्नड–जळगाव या बंद मार्गांवरील बसेसही पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी शेख अजहर, रामदास चौधरी, रंगनाथ मोरे, जगन्नाथ चौधरी, राम चौधरी यांच्यासह अन्य प्रवाशांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *