Headlines

गवळीशिवरा शिवारामध्ये 46 वर्षीय महिलेचा खून:दगडाने ठेचलेल्या अवस्थेमध्ये आढळला मृतदेह‎




गंगापूर तालुक्यातील गवळीशिवरा-आरापुर शिवारात मंगळवारी दुपारी एका ४६ वर्षीय महिलेचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सुमन कडू काकडे (४६, रा. वडाळी ह.मु. गवळी धानोरा ता. गंगापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. मृत सुमन काकडे या त्यांच्या माहेरी गवळी धानोरा येथे भावाकडे राहत होत्या. केवायसी करण्यासाठी लासूर स्टेशनला जाते म्हणून सोमवारी कागदपत्रे घेऊन त्या घराबाहेर पडल्या. त्यानंतर घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्यांचा बराच शोध घेतला होता. मंगळवारी दुपारी एका शेतकऱ्याते शेत नांगरणीचे काम सुरू असताना गवळीशिवरा शिवारातील रस्त्यालगत असलेल्या गट क्रमांक ८९ मध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर सदर माहिती पोलिस पाटील बद्रीनाथ केरे यांनी पोलिसांना दिली. सदर माहिती शिल्लेगाव पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेऊन महिलेची ओळख पटवून तपासाची चक्री फिरवली. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश पालवे, पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी नातेवाइकांच्या तक्रारीनंतर अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती शिल्लेगाव पोलिसांनी दिली. गायब महिलांच्या यादीवरून पटली ओळख मृत महिलेचा चेहरा दगडाने ठेचल्याने ओळख पटविण्याचे आव्हान होते. शेवटी पोलिसांनी गायब झालेल्या महिलांची यादीवरून तसेच इतर लक्षणावरून सदर महिलेची ओळख पटविली. पोलिसांनी पुढील तपासाची चक्रे जलद गतीने फिरवली आहे. मयत महिलेचे शवविच्छेदनानंतर बुधवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. आरोपीच्या शोधासाठी पोलीसांच्या हालचाली सुरू आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *