![]()
भंडारा डोंगरावर तप करणारे थोर संत तुकाराम महाराज यांनी संसाराचा त्याग करून देव भेटवला. संतांच्या विचारांचा खजिना उघडुन सामान्य नागरिकांना संतांचे विचार देऊन समाधानी केले. त्यांचे विचार आज आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अतुल महाराज अंदमाने (न
.
कन्नड तालुक्यातील करंजखेड येथील तलाववाडी ते बालखेड रोडजवळील डोंगरावर असलेल्या गणेश गडावर श्री विघ्नेश्वर गणपती देवस्थान येथे अंगारकी चतुर्थीनिमित्ताने एक दिवसीय कीर्तन महोत्सव पार पडला. यावेळी ते बोलत होते. करंजखेड येथील श्री विघ्नेश्वर गणपती देवस्थान निवांत डोंगरावर आहे. सामान्य नागरिक दर्शनासाठी येतात. एक दिवस संसाराचा त्याग करताना दिसतात. संताची वाणी व पत्रकारांची लेखणीतून संतांचे विचार घरोघरी सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे मोठे माध्यम पत्रकारांच्या माध्यमातून होत आहे, असेही अतुल महाराज अंदमाने यावेळी म्हणाले. शेतकरी बाबूराव पाटील काळे, दिलीप क्षीरसागर, माजी सैनिक रामभाऊ ढेपले, अंकुश पाटील गाढवे, वैभव वळवळे या दांपत्याच्या हस्ते मानाची आरती करण्यात आली. यावेळी ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था अध्यक्ष राम महाराज ढमाले यांच्यासह वारकरी संप्रदायातील संदीप महाराज पवार, बजरंग महाराज सुराशे, राहुल महाराज धामणी, धनराज मालोदे, मगर महाराज वाकी, चैतन्य महाराज, विकास महाराज, सचिन डामरे, योगेश गवारे, भिकन जाधव, ज्ञानेश्वर जाधव, देविदास गाढवे यांनी गायनाचार्य म्हणून साथ दिली. निवृत्ती काळे यांच्या वतीने दर्शनासाठी आलेल्या भाविकांना साबुदाण्याची खिचडीचे वाटप केले. करंजखेड, माळेगाव, नागापूर, बालखेड, तलाव वाडी, पाबळवाडी, चिमणापुर, नेवपुर, वाकी, घाटशेन्दा व पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
विघ्नेश्वर मंदिर परिसरामध्ये स्वच्छता मोहीम, भाविकांचा मोठा सहभाग मंगळवारी सकाळी मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली. तसेच श्री विघ्नेश्वर गणपती बाप्पांना “गणेश पूजन’ व अभिषेक करण्यात आला. दुपारी विघ्नेश्वर गणपती भजनी मंडळातर्फे टाळ मृदंगाच्या गजरात भजने सादर करत आलेल्या दिंडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी करंजखेड, माळेगाव, नागापूर, बालखेड, तलाव वाडी, पाबळवाडी, चिमणापुर, नेवपुर, वाकी, घाटशेन्दा व पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दिवसभर मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यशस्वितेसाठी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.