![]()
सिल्लोड -भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावत सेवानिवृत्त झालेले तळणी गावचे सुपुत्र दिलीप चंदन यांचा सत्कार करुन, सजवलेल्या जीपमधून शहरातून मिरवणूक काढण्यात आली. सिल्लोड तालुक्यातील तळणी गावातील दिलीप पुंजाराम चंदन हे २००४ मधे केंद्रीय रिझर्व राखील दलात भरती झाले होते. त्यांनी जम्मु कश्मीर, छत्तीसगड, झारखंड, गडचिरोली ( महाराष्ट्र ), नागालँड आदी ठिकाणी २२ वर्ष देशसेवा केली. सशस्त्र सेना दलातून ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले. सिल्लोड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास सेवानिवृत्त सैनिक दिलीप चंदन यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन वादन केले. य प्रसंगी उपनगराध्यक्ष विठ्ठलराव सपकाळ, माजी सैनिक बबनराव वाघ सामाजिक कार्यकर्ते कृष्णा वाघ, दिलीप वाघ रत्नाकर वाघ आदिंच्या प्रमुख उपस्थितीत सेवा पूर्ती सोहळ्या निमित्ताने सपत्नीक सत्कार करण्यात आला. सजवलेल्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. शहरातील विविध चौकांमध्ये त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या. शिक्षक कॉलनी, बालाजीनगर येथे त्यांच्या निवासस्थानी मिरवणुकीची व कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी राजू अपार, नंदकुमार जाईबहार, हेमंत मोहिते, मनोज लिंगायत, हरिश्चंद्र मोहिते, मधुकर घेनेकर यांच्यासह आजी माजी सैनिक, प्रतिष्ठित नागरिक, नातेवाईक व हितचिंतक यांची उपस्थिती होती.
Source link
सेवानिवृत्त सैनिकाची मिरवणूक:विविध चौकांमध्ये केला सत्कार