Headlines

झिपरू अण्णा महाराजांची आज पालखी मिरवणूक:मंदिरात काल्याचे कीर्तन होईल व महाप्रसाद वाटप




नशिराबाद | ग्रामदैवत झिपरू अण्णा महाराजांच्या ७७ व्या पुण्यतिथीनिमित्त ११ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात सकाळी ७ वाजता श्रींचा अभिषेक, पूजन होईल. नंतर गावातील प्रमुख रस्त्यावरून श्रींच्या पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. परंपरेप्रमाणे संत गजानन महाराज मंदिरात पालखी, श्री पादुकांचे पूजन व दोन्ही संतांची भेट होईल. रामपेठमार्गे साती बाजार, खालची आळीमार्गे कै. भैय्या मास्तर कुलकर्णी यांच्या घरी पालखीचे स्वागत, पूजन होईल. तेथून समाधी मंदिराकडे मार्गस्थ होईल. मंदिरात काल्याचे कीर्तन होईल व महाप्रसाद वाटप केले जाईल. भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *