बिडकीन येथे उभारण्यात येणाऱ्या टोयोटा किर्लोस्कर मोटर्सच्या (टीकेएम) प्लँटमधून पहिली एसयूव्ही कार 2029 च्या पहिल्या सहा महिन्यांत बाहेर पडणार असल्याची घोषणा टोयोटा कंपनीतर्फे पहिल्यांदाच बेंगळुरू येथून करण्यात आली. या प्लँटमधून वर्षभरात 1 लाख वाहनांच
.
टोयोटाचे कर्नाटकमधील बिदादी येथे दोन प्लांट्स कार्यरत आहेत. त्यांची एकत्रित क्षमता 3.42 लाख वाहनांची आहे. कंपनीने अधिकृत घोषणा केली नसली तरी बिडकीन येथे तयार होणारी एसयूव्ही इलेक्ट्रिक किंवा हायब्रिड मॉडेल असू शकते.
35 वर्षांपासून संभाजीनगर बिडकीन रस्ता दर्जाहीनच
टोयोटा 20 हजार कोटी आणि इतर कंपन्याही कोट्यवधींची गुंतवणूक करून बिडकीन येथे येत आहेत. मात्र, गेल्या 35 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर ते बिडकीन रस्ता निकृष्ट दर्जाचा आहे. त्यात कोणतीही सुधारणा झालेली नाही. आता तर संभाजीनगर जलवाहिनी कामासाठी अनेक ठिकाणी रस्ता खोदलेला आहे. बिडकीनपुढेही रस्त्याची स्थिती बिकटच आहे.
2030 पर्यंत महाराष्ट्र 1 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था
नवी दिल्ली येथे सीआयआयच्या वार्षिक व्यापार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत 1 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.
छत्रपती संभाजीनगरात 21 हजार हातांना काम
टोयोटाशिवाय छत्रपती संभाजीनगर (बिडकीन) येथे एथर एनर्जी, जेएसडब्ल्यू-जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी, रिलायन्स इन्फ्रा, जेनसॉल इंजिनिअरिंग, अन्वी पॉवर- लिथियम बॅटरी आदी 5 प्रमुख कंपन्या कार्यान्वित होण्याच्या टप्प्यात आहेत. या कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे किमान 21 हजार हातांना काम मिळू शकेल, असा अंदाज आहे.

17 वर जाऊ शकते विमानफेऱ्यांची संख्या 5 वर्षांत चिकलठाणा विमानतळावरून विमानफेऱ्यांची संख्या 8-9 वरून 17 वर जाऊ शकते.
5 मोठी हॉटेल्स, 10 सिनेमागृहे होतील येत्या 10 वर्षांत संभाजीनगर, बिडकीनमध्ये 5 मोठी हॉटेल्स, 10 सिनेमागृहे उभी राहू शकतात.
मोठी रुग्णालये 22 वरून 44 वर जातील सध्या सरकारी, खासगी मोठी रुग्णालये 22 आहेत. 5 वर्षांत त्यांची संख्या 44 होऊ शकते.
15 हजार घरे तयार, जमिनीचे भाव दुप्पट पैठण रोड, बिडकीन परिसरात 15 हजार घरे तयार आहेत. जमिनीचे भाव आताच दुप्पट झाले आहेत.
शिक्षण अर्थव्यवस्था 15-20% वाढेल 20 हजार कुटुंबे कामानिमित्त येतील. त्यातून शहराची शिक्षण अर्थव्यवस्था 15-20% वाढेल.
20 हजार जणांच्या हाताला मिळेल काम टोयोटात 2800 जणांना थेट रोजगार मिळणार आहे. अप्रत्यक्ष रोजगार 17 हजार जणांना मिळेल.
सुटे भाग युनिटमुळे 9400 कोटी येणार सीएमआयएचे अध्यक्ष उत्सव माछर म्हणाले, 21 सुटे भाग युनिटमुळे 9400 कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे.
कनेक्टिव्हिटी, जमीन उपलब्ध म्हणून केली बिडकीनची निवड
ऑरिक ही भारतातील पहिले स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी आहे. येथे कंपन्यांना फक्त आपले यंत्र (मशिनरी)आणून काम सुरू करायचे असते. छत्रपती संभाजीनगर आधीच ऑटोमोबाइल हब आहे, टोयोटासारख्या मोठ्या प्लँटसाठी शेकडो एकर सलग जमीन लागते. जी बिडकीनमध्ये सहज उपलब्ध झाली. येथे केवळ सध्याचा प्लँट नाही, तर भविष्यात उत्पादन क्षमता वाढीसाठीची अतिरिक्त जमीनही उपलब्ध आहे. बिडकीनला जोडलेला समृद्धी महामार्ग, मुंबई पोर्ट व नागपूरशी वेगवान संपर्क, बिडकीन हे कॉरिडॉरचा महत्त्वाचा भाग व विमानतळ या बाबी महत्त्वाच्या ठरल्या. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अँकर प्रोजेक्ट असावा यासाठी सरकार तसेच शहरातील औद्योगिक संघटनांकडून सातत्याने सुरू प्रयत्न होते. त्यामुळे 2024 मध्ये टोयोटासोबत करार झाला.
सीएमआयएचा पुढाकार या गुंतवणुकीसाठी सीएमआयएसारखी संघटना, सर्वच नेते प्रयत्नरत होते. जागा पाहण्यासाठी टोयोटाचे अधिकारी ज्या वेळी शहरात येत असत त्या वेळी ते प्रत्येक भेटीवेळी किमान 250 किमीचा प्रवास करत होते.

नवीन एसयूव्हीचे उत्पादन
बिडकीनला टोयोटाच्या नवीन एसयूव्ही मॉडेलची निर्मिती होईल. येथे वाहनांचे स्टॅम्पिंग, वेल्डिंग, पेंटिंग, असेंब्लिंग होईल. बिडकीन प्रकल्पातून भारताच्या शेजारील देशांमध्येही वाहनांची निर्यात होणार आहे.