Headlines

"भोंदु गुरू माऊली'चा विशेष तपास, धाराशिवनंतर पंढरीतून तिसरी तक्रार:समाजमाध्यमावरील छबी डिलीट, धाराशिवच्या भक्ताचा नोंदवला जबाब‎




कासव देऊन पाठीमागील पीडा दूर करण्याचा दावा करून अनेक भक्तांची आर्थिक लुट करणारा नानासाहेब विरकर उर्फ गुरु माऊली याने अनेकांची फसवणूक करुन आर्थिक लुट केल्याचे प्रकरणे समोर येऊ लागली असून रविवारी दि १० रोजी धाराशिव आणि सोमवार दि.११ मे रोजी पंढरपूरच्या पिडीत भक्तांने आपलीही फसगत झाल्याची ऑनलाईन तक्रार दाखल केली असून त्याची पडताळणी करण्याचे काम चालू आहे.दरम्यान पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दोन विशेष अधिकारी नेमून चौकशी सुरू केली आहे.चौकशीचा तपशील मात्र गुप्त ठेवण्यात आला आहे. आढेगाव ता माढा येथील स्वयंघोषित नाना महाराज गुरू माऊली याने अनेकांना आपल्याकडे दैवी शक्ती आहे त्याचे आधारे मानसिक व आर्थिक अडचणी दूर करतो असे म्हणून कासव देऊन पैसे लुटुन फसवले असल्याप्रकरणी पंढरपूर येथील निलेश भुईटे याने गुन्हा दाखल केल्यानंतर धाराशिव व पंढरपूर येथील दोघांनी सलग दोन दिवस तक्रार दाखल केलेच समोर आले असून आणखीन किती जणांची फसवणूक झाली आणि किती तक्रारदार समोर येतात याकडे पोलिस प्रशासनाची नजर आहे.तसेच महाराजांकडून गुन्ह्याची उकल करण्यासाठी मुंबई आणि पुण्यातील दोन अधिकाऱ्यांमार्फत रविवारी उकल करण्याचा प्रयत्न केला पण चौकशीची तपशील दिला नाही. खरात प्रमाणे सोलापुरात भोंदू मनोहर बाबा आणि त्यानंतर अन्य भोंदूबाबा मिळून येत आहेत. हे बाबा वयाने लहान असलेतरी त्यांच्याकडील जमीनीची व्यवहार मोठ्या प्रमाणात बाहेर येत आहेत. अशा भोंदू गिरीला आळा घालण्यासाठी पोलिस योग्य पध्दतीने तपास करत आहेत. या बाबांच्या मुसक्या आवळण्यात येतील असे पालकमंत्री गोरे म्हणाले. तसेच धाराशिव येशील भक्ताने आपल्याला भरमसाठ पैसा घेऊन कासव देत फसवणूक केली असल्याचे सांगत त्याचे विरोधात जबाब नोंदवला आहे.तर त्यांचे संपर्कात असलेल्यांना धरपकड करून चौकशी सुरू करताच आपण महाराजांच्या जवळचे म्हणतायेत आता आपला काही संबंध नाही असे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत.तसेच महाराजांकडून गुन्ह्याची उकल करण्यासाठी मुंबई आणि पुण्यातील दोन अधिकाऱ्यांमार्फत उकल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भोंदूबाबांचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत याचा तपास सुरू आहे. अधिक माहिती पोलिसांनी दिली नाही. नानासाहेब विरकर व त्याचा भाऊ विकास विरकर यांचेवर लक्ष्मी टाकळी येथील निलेश भुईटे याने पैशाचा पाऊस पाडतो,मागील पिडा चालवून यश मिळवून देतो म्हणून जिवंत कासव देऊन २३५००० रुपये उकाळणाल्याप्रकरणी अटकेत असलेल्या महाराजांबरोबर आमचे जवळचे संबंध असल्याचे दाखवण्यासाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्स ॲप वर अनेक भाविक भक्तांनी फोटो शेअर केले होते.परंतू त्याला पोलिसांनी बेड्या ठोकताच सर्रास सर्वांनी त्याचे सोशल मिडियावर शेअर केलेले फोटो डिलीट केले आहेत‌.तसेच अनेकांनी झंझट नको म्हणून आपले सोशल मीडियाचे अकाऊंट बंद केले आहे. नाना विरकर याचे वडील बापू सोपान विरकर,याचे नावावर दोन एकर बागायत शेती आहे.त्यामध्ये उस आहे.त्यच शेतीमध्येच त्याने तीन खोल्या पत्र्याचे बांधून मठ तयार केलेला आहे. यास बिगरशेती परवानगी नसल्याचे सांगण्यात येते. नाना विरकर उर्फ गुरु माऊली यांचे एका विधवा महिलेशी अनैतिक संबंध आहेत. तिला अगोदरच्या पतीपासून २ मुले आहेत. तिच्या पतीचे निधनावरून संशय व्यक्त होत असून तिची पंढरपूर पंचक्रोशीतील 3 एकर जमीन असून तिच्या पतीच्या मृत्यूनंतर इन्शुरन्सची मोठी रक्कम मिळणार होती. त्या प्रॉपर्टी व पैशासाठीच भोंदूबाबाने तिला प्रेमाचे जाळ्यात ओढल्याची चौकशी होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *