Headlines

ओळख लपवण्यासाठी फरार आरोपी बनला भिकारी:पंढरपूर येथून अटक, सिल्लोड ग्रामीण ठाण्यामध्ये दाखल होता मनुष्यवध, विनयभंगाचा गुन्हा‎




मनुष्यवध, विनयभंगासारख्या गुन्ह्यात एका महिन्यापासून फरार असलेला सिल्लोड तालुक्यातील भवन येथील आरोपी पंढरपूर येथे लपून बसला होता. ओळख लपवण्यासाठी तो भिकारी बनला. मात्र, सिल्लोड पोलिसांनी अखेर त्याला सोमवारी सकाळी ११ वाजता पंढरपूर येथील मंदिरासमोरून भिकाऱ्याच्या वेशात असताना अटक केली. अनिल मनोहर मोहिते, (रा. भवन ता. सिल्लोड) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ३ एप्रिल रोजी भवन येथे एका महिलेच्या घरी कोणी नसल्याची संधी साधून सदर आरोपींनी घरात प्रवेश करून महिलेचा विनयभंग केला होता. मदतीस आलेल्या तिच्या पतीला बेदम मारहाण केल्याने हृदयविकाराचा झटका आल्याने त्या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात अनिल मोहितेविरुद्ध मनुष्यवधाचा व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आरोपी पोलिसांना चकमा देऊन पसार झाला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड ग्रामीण स्टेशनचे पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे, फौजदार मनीष जाधव, पोलिस नाईक दीपक इंगळे, कॉन्स्टेबल दीपक पाटील यांनी गोपनीय माहितीच्या आधारावरून तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हा पंढरपूर येथे मंदिर परिसरात भिकाऱ्याच्या वेशात लपून राहत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिस पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेत त्यास बेड्या ठोकल्या. आरोपीला सिल्लोड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे. पंढरपूर मंदिरासमोरूनच आरोपीस केले जेरबंद ३ एप्रिल रोजीच्या घटनेनंतर आरोपी फरार होता. तो सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील मंदिरासमोर भिकाऱ्याच्या वेशात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्यास अटक केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *